Eknath Shinde : ‘टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…

ADVERTISEMENT

cm eknath shinde devendra fadnavis maratha reservation jalna manoj jarange patil
cm eknath shinde devendra fadnavis maratha reservation jalna manoj jarange patil
social share
google news

CM Eknath Shinde : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी पाण्याचाही त्याग केल्याने सरकारने तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकही बोलवण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ते आरक्षण टिकणारे असावे. कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात ते सापडू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

सरकार प्रयत्नशील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका मांडताना सांगितले की, आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करणार नाही. तसेच कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि ते कायमस्वरुपी टिकणारे असावे यासाठी सरकार प्रयत्न करत असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासठी
कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘फडणवीसांनी दिलेले मराठा आरक्षण फसवणूक करणारे’, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले गंभीर आरोप

आरक्षणाला बाधा नको

सर्वपक्षीय बैठक बोलवली असतान एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून देण्यात येणारे आरक्षण टिकणारे असावे. तसेच कायद्याच्या चौकटीत आरक्षणाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत असून कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता देण्याचा प्रयत्न केला जात आहे असंह त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीआधी देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…,’ओबीसीवर अन्याय…’

सुचनांचे पालन होणार

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता पाण्याचाही त्याग केल्यामुळे सरकारकडून आता आरक्षणावर ठाम निर्णय घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय बैठकीत सरकार काय निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता देणार आहे. त्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलवली असून आरक्षणावर आता सूचना काय येणार त्यावरही विचार विनिमय करुन सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT