Mumbai Tak Chavadi: भाजपसोबत युती करणार?, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले...
Aaditya Thackeray: भाजपसोबत भविष्यात युती करणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी मुंबई Tak चावडी या विशेष कार्यक्रमात नेमकं काय दिलं उत्तर
ADVERTISEMENT

Aaditya Thackeray Mumbai Tak Chavadi: मुंबई: शिवसेना (UBT) चे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई Tak चावडीवर भाष्य करताना भाजपसोबत भविष्यात युती करणार का? याविषयी मोठं भाष्य केलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये सामील होण्यासाठी पवार आणि ठाकरेंना थेट ऑफर दिलेली असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी याबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. (mumbai tak chavadi alliance with bjp aaditya thackeray made a very big statement)
मुबंई Tak चावडीवर बोलताना आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिलं. याचवेळी त्यांना भविष्यात शिवसेना (UBT)भाजपसोबत युती करणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरेंनी 'या' भाजपसोबत तरी नाही.. असं उत्तर यावेळी दिलं.
भाजपसोबत युती करणार का? पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले...
'जर ग्रूमिंग झालं असतं तर मी खोटं बोलू शकतो असतो.. पण ग्रूमिंग झालं नाही..'
'नाही.. नाही.. नाही... असंच म्हणाले होते ना..'
'मतदारांनी हे स्पष्ट ठरवणं गरजेचं आहे.. की, महाराष्ट्र हिताचा कोण विचार करतंय.. मतदारांनी हा पण विचार केला पाहिजे की, भाजपला मतदान करून काय फायदा होणार आहे. हा विचार प्रत्येक राज्यात झाला पाहिजे.'










