Uddhav Thackeray : '...तो मोदींचा खोटेपणा!', पंतप्रधानांच्या 'त्या' विधानावर ठाकरे प्रचंड चिडले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Uddhav thackeray saamana interview criticize pm narendra modi loksabha election 2024 bjp shiv sena alliance
नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना बाळा जो जो रे करताय?
social share
google news

Uddhav Thackeray Saamana Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंबाबत सुर बदलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काहीच दिवसांपुर्वी मोदींनी उद्धव ठाकरे माझे शत्रु नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर मदतीला धावून जाईन, असं मोठं विधान मोदींनी केले होते. इतकेच नाही तर ठाकरे, पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली होती.यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी त्यांच्या मुलाखतीत उत्तरे दिली आहेत. हा मोदींचा खोटेपणा असल्याची टीका आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर (PM Narendra Modi) केली आहे.  (Uddhav thackeray saamana interview criticize pm narendra modi loksabha election 2024 bjp shiv sena alliance) 

उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे.या मुलाखतील पंतप्रधानांच्या विधानावर आता ठाकरेंनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ''अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय? आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना बाळा जो जो रे करताय? असा सवाल ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केला आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha : 'अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, पाकीट वाटली...'

तसेच मोदी यांनी म्हणे शिवसेनेविषयी गोड बोलणे सुरु केले आहे. हा त्यांचा खोटेपणा आहे.आता त्यांच्यासोबत कदापी जाणार नाही. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केलाय. त्यांच्याबरोबर हातमिळणवी कदापी शक्य नाही,'' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच्या युतीवर स्पष्ट भूमिका मांडली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Devendra Fadnavis Exclusive : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार का?

शिवसेनेला सूडबुद्धीने नष्ट करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींकडून झाला? असा सवाल ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर ठाकरेंनी त्यांच्या शंभर पिढ्या जरी अवतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सुरत लुटली होती. कारण तिथले काही व्यापारी इंग्रजांना मदत करत होते. त्यांच्या वखारी महाराजांनी लुटल्या होत्या. कदाचित तिथपासून हा राग या दोघांच्या (मोदी-शाह) मनात आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT