'कृष्णा आंधळे 3 ते 4 वेळा गावात येऊन गेला...' संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा
Beed News : बीडच्या मस्साजोग गावचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष होऊन गेलं, तरी अद्याप कृष्णा आंधळेचा तपास लागलेला नाही. या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय म्हणाले आमदार प्रकाश सोळंके?
'मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला जेरबंद करण्याचे आदेश द्यावेत'
Beed News : योगेश काशिद - बीडच्या मस्साजोग गावचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष होऊन गेलं, तरी अद्याप कृष्णा आंधळेचा तपास लागलेला नाही. या प्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं. या प्रकरणात इतर आरोपींना पकडलं, पण कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळे हा 3 ते 4 चार वेळा गावात येऊन गेल्याची धक्कादायक माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : अहिल्यानगर : शाळेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
धनंजय देशमुख यांनी दावा केला की, 'संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे त्यांच्या गावी येऊन गेला होता. तो एकदा दोनदा नाहीतर तीन ते चार वेळा गावात येऊन गेला होता असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. या प्रकरणी सीआयडीला माहिती दिली, पण आरोपीकडे कोणाताही मोबाईल नसल्याने त्यांचा तपास करणे कठीण जात आहे', असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार प्रकाश सोळंके?
प्रकाश सोळंके म्हणाले की, 'तो अनेकदा गावात देखील येऊन गेला होता, याबाबत धनंजय देशमुख यांनी धक्कादायक खुलासा केला. जसं इतर आरोपींना पकडण्यात यश आलं, पण कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारहण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग होता, पोलीस अद्यापही अटक करू शकले नाही हे धक्कादायक आहे'.
हे ही वाचा : नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत
'मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला जेरबंद करण्याचे आदेश द्यावेत'
अशातच 'धनंजय देशमुखने मागणी केली की, त्याच्या गावाकडे तो आरोपी तीन-चार वेळा येऊन गेला. या प्रकरणी सीआयडीला देखील त्यांनी माहिती दिली होती. तरीही आरोपी पकडला जाऊ शकत नाही, यामुळे तपास यंत्रणेचे आरोपी त्याचा बचाव करत आहेत असा निष्कर्ष काढला जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला जेरबंद करण्याचे आदेश द्यावेत.










