नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत
नागपुरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीसोबत देखील अश्लील कृत्य करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार...
पीडितेच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य!
नागपुरचा प्रॉपर्टी डीलर अटकेत
Nagpur Crime: नागपुरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीसोबत देखील अश्लील कृत्य करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या टाटा कॅपिटल हाइट्स येथील रहिवासी असलेल्या आरोपी प्रीतम वानखेडे (34) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. 37 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, 2015 मध्ये तिचं लग्न झालं असून तिचा पती कामानिमित्त दुबईत राहतो. खरं तर, पती आणि पत्नीमध्ये सतत मदभेद सुरू होते आणि त्यामुळे ती तिच्या मुलांसोबत पतीपासून वेगळी राहत होती.
लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध...
आरोपी वानखेडे हा प्रॉपर्टी डीलर असल्याचा दावा केला असून तो प्लॉट म्हणजेच जमीन खरेदी करण्याच्या निमित्ताने पीडितेला भेटला. कालांतराने, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, आरोपी तरुणाने संबंधित महिलेला सांगितलं की, त्याचे त्याच्या पत्नीशी सुद्धा वाद होत असतात. त्यामुळे, आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन पीडितेसोबत लग्न करणार असल्याचं त्याने तिला आश्वासन दिलं होतं. मार्च 2024 मध्ये आरोपी पीडित महिलेला टाटा कॅपिटल हाईट्समधील त्याच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हे ही वाचा: बीड: ब्युटीपार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गरोदर; पीडितेच्या अपहरणकर्त्यास अटक
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
इतकेच नव्हे तर, त्यानंतर आरोपीने बऱ्याच ठिकाणी पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे त्याने पीडित महिलेच्या मुलीसोबत सुद्धा अश्लील कृत्य केलं. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणल्यास तिला मारहाण देखील करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंबंधी पीडितेने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी वानखेडेला ताब्यात घेतलं आहे.










