मालकीण बाईचा नोकरावर जीव जडला, लागलीच विवाह उरकला, पण शेवटी डोक्याला हात लावायची वेळ
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरल या एका आयटी कंपनीच्या मालक आहेत. त्यांनी नरसिंहपूर गावातील मनोज नायक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मनोज त्यांच्या कंपनीत काम करत होता आणि त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मालकीण बाईचा नोकरावर जीव जडला, लागलीच विवाह उरकला
पण शेवटी डोक्याला हात लावायची वेळ
Crime News : गुजरातमधील एका महिलेने पतीविरुद्ध कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ ओडिशातील पोलीस ठाण्यात फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी भद्रक जिल्हा येथे घडली.
अहमदाबाद येथील निरल मोदी यांनी बोंथ पोलीस स्टेशन येथे जाऊन फिनाइल प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पतीवर पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरल या एका आयटी कंपनीच्या मालक आहेत. त्यांनी नरसिंहपूर गावातील मनोज नायक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मनोज त्यांच्या कंपनीत काम करत होता आणि त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
लग्नानंतर मनोजने निरल यांना आपल्या गावी व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप आहे. व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी निरल यांनी स्वतःचे घर आणि कंपनीची मालमत्ता गहाण ठेवून सुमारे 5 कोटी रुपये कर्ज घेतले.










