चोरीच्या उद्देशाने घरात शिरला, लकवाग्रस्त पतीसमोर पत्नीचा गळा चिरला, नवऱ्याच्या डोळ्यासमोर बायकोने जीव सोडला!
Bengaluru Crime News : अधिकची माहिती अशी की, नेलमंगळा परिसरातील हिरापूर येथील कोटे बीडी भागात शोभा या आपल्या पती रंगनाथ यांच्यासोबत राहत होत्या. दाम्पत्याला अपत्य नव्हते. रंगनाथ गेल्या 15 वर्षांपासून लकवाग्रस्त असून पूर्णपणे अंथरुणावर अवलंबून आहेत. घटनेच्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे फेरफटका मारून घरी परतले होते. रात्री सुमारे 1.03 वाजता आरोपी शिवकुमार घरात शिरला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चोरीच्या उद्देशाने घरात शिरला, लकवाग्रस्त पतीसमोर पत्नीचा गळा चिरला,
नवऱ्याच्या डोळ्यासमोर बायकोने जीव सोडला!
Bengaluru Crime News : देशाचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लुटीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना तिच्या लकवाग्रस्त पतीसमोरच घडली. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिकची माहिती अशी की, नेलमंगळा परिसरातील हिरापूर येथील कोटे बीडी भागात शोभा या आपल्या पती रंगनाथ यांच्यासोबत राहत होत्या. दाम्पत्याला अपत्य नव्हते. रंगनाथ गेल्या 15 वर्षांपासून लकवाग्रस्त असून पूर्णपणे अंथरुणावर अवलंबून आहेत. घटनेच्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे फेरफटका मारून घरी परतले होते. रात्री सुमारे 1.03 वाजता आरोपी शिवकुमार घरात शिरला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने धारदार शस्त्राने शोभा यांचा गळा चिरून खून केला. महिला रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असताना त्यांच्या शेजारी पडलेले पती काहीच करू शकले नाहीत.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागांत तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
हत्येनंतर आरोपीने घरात रोख रक्कमेचा शोध घेतला. पैसे न सापडल्याने त्याने महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी, बांगड्या आणि इतर दागिने काढून घेतले. पोलिसांच्या अंदाजानुसार सुमारे 450 ग्रॅम सोने चोरीस गेले असून त्याची किंमत सुमारे 65 लाख रुपये आहे.










