आधी देवाला जाऊन आला मग केली हत्या, मुलानं वडिलांना का संपवलं?
Crime News : एका मुलाने आपल्या 65 वर्षीय वडिलांची हत्या केली. निमित्त ठरलं पैसे. काही दिवसांपूर्वी वडिलांनी मुलाकडून पैसे घेतले होते. मुलाने पैसे परत मागितल्यावर वडिलांनी नकार दिला. यामुळे दारुच्या नशेत मुलाने काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये वृद्ध वडिलांचा जागीच मृत्यू झाला. महाशिवरात्रीला ही घटना घडली. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी देवाला जाऊन आला मग केली हत्या
मुलानं वडिलांना का संपवलं?
Crime News : म्हातारपणी आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही मुलांवर असते. मात्र काळ बदलल्याने वृद्ध माता पित्यांची रवानगी वृद्धाश्रमात होऊ लागली. जी मुलं आई-वडिलांना सांभाळतात त्यांच्यातही सतत कुरबुरी सुरु असल्याचं दिसून येतं. अशाच कुरबुरीतून एका मुलाने आपल्या 65 वर्षीय वडिलांची हत्या केली. निमित्त ठरलं पैसे. काही दिवसांपूर्वी वडिलांनी मुलाकडून पैसे घेतले होते. मुलाने पैसे परत मागितल्यावर वडिलांनी नकार दिला. यामुळे दारुच्या नशेत मुलाने काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये वृद्ध वडिलांचा जागीच मृत्यू झाला. महाशिवरात्रीला ही घटना घडली. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
हे ही वाचा : नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत
महाशिवरात्रीच्या दिवशी देव दर्शनाहून परतला अन्...
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे. मृत बाबूलाल जाटव यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. दोन मुले वेगळी राहतात, तर मधला मुलगा रवी वडिलांसोबतच राहायचा. महाशिवरात्रीच्या दिवशी रवी देवदर्शन घेऊन घरी परतला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने वडिलांकडे काही दिवसांपूर्वी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. थोड्या वेळाने रवी मद्यधुंद अवस्थेत पुन्हा घरी आला आणि त्याने पुन्हा पैशांसाठी तगादा लावला.
दारुच्या नशेत हत्या
भांडण विकोपाला गेल्यावर रागाच्या भरात रवीने घरातील काठी उचलली आणि वडिलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. बाबूलाल हे देखील नशेत असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. डोक्यावर आणि शरीराच्या नाजूक भागांवर गंभीर दुखापत झाल्यामुळे बाबूलाल यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.










