2 वर्षाच्या भाच्याचा गळा आवळला, बागेत मृतदेह घेऊन बसली, मावशीने का उचललं टोकाचं पाऊल?

मुंबई तक

Crime News : एका 30 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या भाच्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजरा असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने चिमुरड्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन ती बागेत बसून राहिली. स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2 वर्षाच्या भाच्याचा गळा आवळला

point

बागेत मृतदेह घेऊन बसली

point

मावशीने का उचललं टोकाचं पाऊल?

Crime News : एका 30 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या भाच्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजरा असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने चिमुरड्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन ती बागेत बसून राहिली. स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. धक्कादायक म्हणजे, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ही महिला मृतदेह सोडायला तयार नव्हती, त्यामुळे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दिल्लीच्या मुखर्जीनगर परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत

पार्कमध्ये  केली हत्या

मृत बालक हादी हा आपल्या आईसोबत मुखर्जी नगरमधील एसएफएस फ्लॅट्समध्ये मामाच्या घरी आला होता. शुक्रवारी (20 फेब्रुवारी) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. बागेत काम करणाऱ्या एका माळ्याने आजराला मुलाचा गळा दाबताना पाहिले होते. त्याने आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. एका स्थानिक व्यक्तीने मुलाला आजराच्या तावडीतून सोडवून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मावशी ताब्यात

मृत हादी हा मूळचा दिल्लीतील सीलमपूरचा रहिवासी असून त्याचे वडील आदिल तिथेच राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादीच्या मामानेच फोन करून या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी मावशीला ताब्यात घेतले आहे. हादीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या क्रूर कृत्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या आरोपी महिलेची कसून चौकशी करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp