कोल्हापूर : चैनीसाठी पैशाची कमी, नातवाने आजीच्या चहात विषारी रसायन मिसळून सोनं पळवलं, नैसर्गिक मृत्यूचा बनाव

मुंबई तक

Kolhapur Crime News : प्रेम भिऊंगडे याने आजी उषा मारुती भिऊंगडे यांच्या चहात सोन्याच्या दागिन्यांना चकाकी आणणाऱ्या मोरचूदचा वापर केला. अतिशय जीवघेणे असलेल्या या मोरचूदमुळ त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रेम भिऊंगडे याच्या कबूली जबाबातून स्पष्ट केल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याला अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : चैनीसाठी पैशाची कमी

point

नातवाने आजीच्या चहात विषारी रसायन मिसळून सोनं पळवलं, नैसर्गिक मृत्यूचा बनाव

Kolhapur Crime News, कोल्हापूर : चैनीसाठी आजीचा खुन करुन लाखोंचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या प्रेम भिऊंगडेचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला. प्रेम भिऊंगडे याने आजी उषा मारुती भिऊंगडे यांच्या चहात सोन्याच्या दागिन्यांना चकाकी आणणाऱ्या मोरचूदचा वापर केला. अतिशय जीवघेणे असलेल्या या मोरचूदमुळ त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रेम भिऊंगडे याच्या कबूली जबाबातून स्पष्ट केल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सातत्यान पाळत ठेवून तपास केल्यानेच अवघ्या चार दिवसात ऋणमुक्तेश्वर इथल्या खुनाचा उलघडा झाला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पथकाच कौतुक केलं.

हेही वाचा : संशय घेणं महागात! आधी नवऱ्याची आत्महत्या अन् मग पोलिसांच्या समोरच बायकोनं स्वत:ला संपवलं, हादरवून टाकणारं प्रकरण

 कोल्हापुरातील गंगावेश इथल्या ऋणमुक्तेश्वर मंदिरा नजीक असलेल्या शुक्रतारा आपार्टमेंमधील दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटमध्ये 16 फेब्रुवारी 2020 रोजी उषा मारुती भिऊंगडे या  वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. उषा यांना अपत्य नसल्याने त्यांनी पुतण्या परशराम यल्लाप्पा भिऊंगडेलाच दत्तक घेतलं होतं. तो त्यांची नियमित देखभाल करायचा. 15 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजता त्याने उषा भिऊगडे यांना इंजेक्शन देऊन तो चिंतामणी पार्क फुलेवाडी घेतल्या त्याच्या घरी गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उषा यांचा मृतदेह आढळला लक्ष्मीपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकान या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान चार दिवस सातत्याने पाळत ठेवून विविध माध्यमातून या कुटुंबीयांविषयी माहिती घेत पोलिसांनी गोपनीय तपास केला त्यामध्ये दत्तक पुत्र परशराम भिऊगडे याचा मुलगा प्रेम भिऊंगडेनंचं त्यांचा खून केल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी प्रेम भिऊगडेचा शोध घेवून त्याला आज अटक केली. 

सविस्तर चौकशीमध्ये त्यानं, चैनीसाठी रोकड आणि दागिन्याची गरज असल्याने आपणच 16 फेब्रुवारी रोजी शुक्रतारा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये जाऊन आजी उषा यांच्या चहामध्ये मोरचूद या केमिकलचा वापर करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. तसंचं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याची कर्णफुल सोन्याच्या पाटल्या असे दागीने चोरल्याचं सांगितलं. घटना घडल्यापासून अवघ्या चार दिवसात या खुनाच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकान उकल केली. यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार,  पोलीस उप अधिक्षक प्रिया पाटील यांच मार्गदर्शन लाभलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp