हिंगोलीत 61 वर्षीय आजीबाईंनी 10 वी चा पेपर सोडवला, वृद्ध महिलेची प्रेरणादायी जिद्द
Hingoli News : आजीबाईने इयत्ता 10 वी चा मराठीचा पेपर सोडवला. फेमिदा बेगम (वय 61) असे वृद्ध महिलेचं नाव आहे. ही घटना हिंगोलीमधील कळमनुरी शहरातील आहे. त्यांच्या शिक्षणासाठी असलेलील अजीबाईची जिद्द हा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वृद्ध महिला फेमिदा बेगम परिक्षा केंद्रावर दाखल
काम, जबाबदाऱ्या, नातवंड, मुलं,प्रपंच सांभाळत अभ्यास
Hingoli News : एका आजीबाईने इयत्ता 10 वी चा मराठीचा पेपर सोडवला. फेमिदा बेगम (वय 61) असे वृद्ध महिलेचं नाव आहे. ही घटना हिंगोलीमधील कळमनुरी शहरातील आहे. त्यांच्या शिक्षणासाठी असलेलील अजीबाईची जिद्द हा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. वृद्ध महिलेची ही जिद्द महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
हे ही वाचा : दिराने वहिनीच्या बेडरूमकडे लावला CCTV, वहिनीला समजल्यावर घडलं भलतंच!
वृद्ध महिला फेमिदा बेगम परिक्षा केंद्रावर दाखल
फेमिदा बेगम या हातात रायटिंग पॅड घेऊन परिक्षा केंद्रावर दाखल झाल्या. त्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावातील रहिवाशी आहेत. महात्मा फुले या विद्यालयात जाऊन त्यांनी 10 वीची परीक्षा दिली. मनातली शिकण्याची इच्छा मात्र अजूनही तरुणच आहे.
काम, जबाबदाऱ्या, नातवंड, मुलं,प्रपंच सांभाळत अभ्यास
घरातील काम, जबाबदाऱ्या, नातवंड, मुलं, प्रपंच सांभाळत त्यांनी अभ्यास आणि सराव केला, आज त्यांनी मराठीचा पहिला पेपर सोडवला. याच काळात प्रत्येक मुलाने त्यांची साथ देखील दिली. शिक्षणासाठी वयाची कसलीही अट आवश्यक नसते, हीच बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
हे ही वाचा : '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
फेमिदा बेगम यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढंच नाहीतर शिक्षणासाठी कोणताही अट नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फेमिदा बेगम आहेत. शिक्षण घेण्याच्या त्यांच्या या इच्छाशक्तीने तरुणांनी प्रेरणा मिळेल.










