अहिल्यानगर: 15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार! 5 दिवस जंगलात ठेवलं.. 'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!

मुंबई तक

अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरीतून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाला आता 'लव्ह जिहाद'चा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे.

ADVERTISEMENT

15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार!
15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक अत्याचार!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

15 वर्षीय मुलीचं अपहरण अन् 5 दिवस जंगलात ठेवत लैंगिक अत्याचार!

point

'लव्ह जिहाद'चा आरोप; तिन्ही आरोपी गजाआड!

point

अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. राहुरीतून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाला आता 'लव्ह जिहाद'चा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणात, राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक–सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केल्याची माहिती आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांचा तपास 

घटनेतील 15 वर्षीय पीडिता 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. मुलीच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली आणि त्यामुळे तिच्या पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच, अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली. अखेर, पोलिसांच्या तपासानंतर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं. 

हे ही वाचा: 'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?' ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

मुक्तार हैदर पठाण (वय 18 वर्षे) कौसर हैदर पठाण (वय 22 वर्षे) आकाश शरद संसारे (वय 19 वर्षे) अशी मुख्य आरोपींची ओळख समोर आली असून पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती आहे. आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तसेच, पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: मुंबई: व्हिडीओ कॉलवर मोठ्या आवाजात बोलण्यावरून वाद... रस्त्यात तरुणाला काठीने बेदम मारहाण करत निर्दयी हत्या!

'लव्ह जिहाद' असल्याचा आरोप 

दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी या प्रकरणाला 'लव्ह जिहाद' असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली होती. गावकऱ्यांनी देखील गाव बंद ठेवून लव  जिहादचा आरोप केला होता. सध्या, पोलिसांनी प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून या प्रकरणामागे आणखी काही धागेदोरे आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp