छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून गादीत गुंडाळून नेत होते मुलीचा मृतदेह, सावत्र आई-वडील ताब्यात; नेमकं कारण काय?

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाळूज महानगर क्षेत्रातील तिसगाव चौफुली परिसरात ही घटना घडली आहे. एका रिक्षातून 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून नेला जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गुरुवारी उशीरा रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूज पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या सावत्र आई वडिलांना ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून गादीत गुंडाळून नेत होते मुलीचा मृतदेह

point

सावत्र आई-वडील ताब्यात

point

नेमकं कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाळूज महानगर क्षेत्रातील तिसगाव चौफुली परिसरात ही घटना घडली आहे. एका रिक्षातून 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून नेला जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गुरुवारी उशीरा रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूज पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या सावत्र आई वडिलांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला अन् मृतदेह घरातच गाडला; सरकारी शाळेतील शिक्षकाचे भयंकर कृत्य

नागरिकाच्या जागरुकतेमुळे घटनेचा उलगडा

एका सतर्क नागरिकाच्या जागरुकतेमुळे या भीषण घटनेचा उलगडा झाला. संबंधित कुटुंब एका ऑटो-रिक्षातून गादीमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू गुंडाळून कन्नडच्या दिशेने घेऊन जात होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने एका नागरिकाने तातडीने 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तिसगाव चौफुली येथे नाकाबंदी केली आणि संशयास्पद रिक्षा अडवून त्याची झडती घेतली.

'अंत्यविधीसाठी  तिचा मृतदेह नेत आहोत'

पोलिसांनी रिक्षातील गादी उघडून पाहिली असता, त्यात एका तरुणीचा मृतदेह पाहून अधिकारीही चक्रावून गेले. प्राथमिक चौकशीत सावत्र आई-वडिलांनी अजब दावा केला आहे. 'मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, अंत्यविधी करण्यासाठी आम्ही तिचा मृतदेह गावी घेऊन जात आहोत,' असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, मृत्यूची माहिती पोलिसांना न देता अशा प्रकारे मृतदेह लपवून नेल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp