अल्पवयीन मेहुणीला बघून दाजीमध्ये जागा झाला राक्षस, कधी घरात तर कधी हॉटेलवर नको तेच...

मुंबई तक

crime news : दाजीला आपल्या मेहुणीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेसोबतच न्यायालयाने 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. कधी हॉटेल तर कधी घरात मेहुणीसोबत दाजीने नको तेच कृत्य केले.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेहुणीला घरात एकटी बघून दाजीमध्ये राक्षस जागा झाला

point

शाळेच्या बाहेर गाठून पीडितेला हॉटेलवर नेले

Crime News : दाजीला आपल्या मेहुणीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेसोबतच न्यायालयाने 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी हरियाणातील रेवाडी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश लोकेश गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : बीडमध्ये ऊसतोड मजुराच्या 13 वर्षीय मुलीवर ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला दोनदा अत्याचार, आरोपी पोलिसांसमोर हजर

मेहुणीला घरात एकटी बघून दाजीमध्ये राक्षस जागा झाला

खटल्यानंतर, पोलिसांनी सांगितले, 14 जून रोजी 2023 रोजी गावातील पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटलं की, तिच्या दोन्ही बहिणींचा 2015 मध्ये विवाह झाला होता. ती इयत्ता नववीत असताना, शाळेच्या सुट्टीत तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. एके दिवशी, तिची बहीण तिला एकटीला सोडून काही कामासाठी बाहेर निघून गेली होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती. 

घटनेबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास दाजीने पीडितेच्या वडिलांसह भावाला मारण्याची धमकी दिली होती. भीतीने पीडितेनं कोणाला काहीही सांगितलं नाही. दाजी पीडितेचा पाठलाग करून शाळेबाहेर भेटायचा आणि लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करण्यास दबाव आणायचा. 

शाळेच्या बाहेर गाठून पीडितेला हॉटेलवर नेले

या प्रकरणात मुलीने सांगितलं की, 4 जून रोजी ती तिची बहीण. मेहुणा आणि त्यांच्या मुलासोबत हरिद्वारला गेली होती. हरिद्वारहून परतत असताना ते सोनीपतमधील हुमायनपूर येथे भाड्याच्या घरात रात्री राहिले. त्याच रात्री तिच्या मेहुण्याने तिला पुन्हा धमकावले आणि नंतर लैंगिक अत्याचार केला होता. एवढेच नाहीतर पीडितेला शाळेच्या बाहेर गाठून तिला गाडीवर बसवून हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp