बीडमध्ये ऊसतोड मजुराच्या 13 वर्षीय मुलीवर ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला दोनदा अत्याचार, आरोपी पोलिसांसमोर हजर
Beed Crime :बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने ऊसतोड मजुराच्या अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक धाकवून दोनदा लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून दोनदा अत्याचार
आरोपीविरोधात आईची तक्रार
Beed Crime : रोहिदास हातागळे - बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने ऊसतोड मजुराच्या अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक धाकवून दोनदा लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे. आरोपीचे नाव सूरज अशोक खरात असे आहे.
हे ही वाचा : नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत
अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून दोनदा अत्याचार
आरोपी सूरज अशोक खरात हा ऊसतोड मजुरांच्या टोळीचा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. त्याने अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवला. 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सुर्डी सोने सांगवी ता. केज शिवारातील तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले होते. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीवर केज पोलीस ठाणे हद्दीतील हदगावातील एका शेतात नेत कोयत्याचा धाक दाखवून दुसऱ्यांदा अत्याचार केला.
सूरज अशोक खरात याच्याविरुद्ध आईची तक्रार
या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून दि : 10 फेब्रुवारी रोजी रात्री सूरज अशोक खरात याच्याविरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी सूरज खरात हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी रोजी तो पिंक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पुढे हजर झाला.
हे ही वाचा : बीड: ब्युटीपार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गरोदर; पीडितेच्या अपहरणकर्त्यास अटक
या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.










