बेदम मारलं अन् नाल्यात बुडवून केला शेवट, मंदिराजवळच पुजाऱ्याची हत्या, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

Crime News : एका 60 वर्षीय पुजाऱ्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुजाऱ्याने मंदिराजवळ गांजा विक्रीला विरोध केल्यामुळे हत्या त्याची करण्यात आली. आरोपींनी पुजाऱ्याला बेदम मारहाण करून नाल्यात बुडवले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह एका 20 फूट खोल खड्ड्यात फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बेदम मारलं अन् नाल्यात बुडवून केला शेवट

point

मंदिराजवळच केली पुजाऱ्याची हत्या

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : एका 60 वर्षीय पुजाऱ्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुजाऱ्याने मंदिराजवळ गांजा विक्रीला विरोध केल्यामुळे हत्या त्याची करण्यात आली. आरोपींनी पुजाऱ्याला बेदम मारहाण करून नाल्यात बुडवले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह एका 20 फूट खोल खड्ड्यात फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील ही घटना आहे.

हे ही वाचा : नवरा महाराष्ट्रातून घरी पोहोचला, बायकोचा मृतदेह बघून फोडला हंबरडा; पोलिस तपासात भयंकर माहिती उघड

गांजा विक्रीला विरोध केल्याने हत्या

कल्लू प्रजापती उर्फ कल्लू बाबा गेल्या 40 वर्षांपासून देवीच्या मंदिरात राहून पूजा-अर्चा करत होते. मंदिराच्या शेजारीच एक महिला तिच्या दोन भावांच्या मदतीने बेकायदेशीरपणे गांजा विक्रीचा व्यवसाय करत होती. पुजारी कल्लू बाबा यांनी या अवैध धंद्याला अनेकदा विरोध केला होता.  यामुळे त्यांच्यात जुना वाद सुरु होता. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रात्री याच वादातून आरोपींनी पुजाऱ्याला गाठले आणि त्यांचे आयुष्य संपवले. शुक्रवारी (20 फेब्रुवारी) सकाळी काही वाटसरूंनी खड्ड्यात मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

आरोपी फरार

पुजाऱ्याच्या कुटुंबीयांनी राहुल रावत, अंकित तिवारी आणि राहुल कनोजिया या तिघांवर हत्येचा थेट आरोप केला आहे. पोलीस तपासात पुजाऱ्याच्या कपाळावर जखमेच्या खुणा आढळल्या असून, त्यांचा गळा आवळल्याचेही प्राथमिक तपासात आढळले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील.

हे वाचलं का?

    follow whatsapp