Ram Mandir: प्रभू रामाची मूर्ती खरंच अशी असणार… व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Ayodhya Prabhu Ram Statue Viral Photo by central minister Pralhad Joshi What is truth behind it
Ayodhya Prabhu Ram Statue Viral Photo by central minister Pralhad Joshi What is truth behind it
social share
google news

Ayodhya Prabhu Ram Statue Viral Photo : सध्या देशभरात तरूणाईपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांचे डोळे आसुसले आहेत ते प्रभू रामाच्या दर्शनासाठी… 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. सध्या याची जोरात तयारी सुरू आहे. याचा उत्साह केवळ अयोध्येतच (Ayodhya) नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. राम भक्तांसाठी हा खूप आनंदाचा प्रसंग असणार आहे. (Ayodhya Prabhu Ram Statue Viral Photo by central minister Pralhad Joshi What is truth behind it)

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) देशातील अनेक मंत्री, नेते, अभिनेते आणि उद्योगपतींना प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रणे पाठवली जात आहेत. राम मंदिरात प्रभू रामाची नवीन मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ही जगातील सर्वात अनोखी मूर्ती असेल, असं म्हटलं जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा: Aaditya Thackeray ची महाराष्ट्राला हाक! म्हणाले, “गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची…”

खरं तर, दोन कर्नाटकातून आणि एक राजस्थानातून अशा तीन मूर्तींची निवड राम मंदिरात स्थापनेसाठी करण्यात आली आहे. अशा वेळी मूर्तीच्या निवडीवरून जोरदार चर्चा रंगली आहे.पण, व्हायरल झालेला फोटो केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अयोध्या राम मंदिरासाठी प्रभू रामाच्या 3 मूर्तींपैकी एकाची निवड करण्यात आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती 51 इंच उंच असून ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करण्यात येईल.’

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्वीटनंतर सर्वांनाच ते खरं वाटलं. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोतील मूर्ती अजून फायनल झालेली नाही अशी माहिती देत विश्व हिंदू परिषदेने हे स्पष्ट केलं आहे.

वाचा: BJP Video : “…तर मोदींशिवाय पर्याय नाही”, संजय राऊतांना भाजपने दाखवला ‘तो’ व्हिडीओ

विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीय मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी एका निवेदनात सांगितले की, ‘मूर्तींच्या निवडीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. याबाबत ट्रस्टकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या विश्वासार्ह नाहीत. याची घोषणा ट्रस्टचे अधिकारीच करतील.’

ADVERTISEMENT

वाचा: केस स्ट्रेटनिंग केल्यामुळे खरंच कर्करोग होतो? संशोधनात काय?

राम मंदिरात मूर्ती स्थापनेसाठी अधिकाऱ्यांमध्ये मतदान

29 डिसेंबर रोजी ट्रस्टच्या बैठकीत तीन मूर्तींसाठी अधिकार्‍यांनी मतदान केले होते. सर्व सदस्यांच्या वतीने आपापली मते ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना देण्यात आली आहेत. मात्र, ट्रस्टकडून याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, प्रभू रामाच्या मूर्तीबाबत ही माहिती व्हायरल झाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT