Pune News : नीरा देवधर धरणात कोसळली कार, तिघांचा बुडून मृत्यू तर एक बेपत्ता
पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बलेनो कार थेट नीरा देवधर धरणात (Neera deodhar dam) कोसळल्याची घटना घडली आहे. कार चालकाला धुक्क्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे.
ADVERTISEMENT
पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बलेनो कार थेट नीरा देवधर धरणात (Neera deodhar dam) कोसळल्याची घटना घडली आहे. कार चालकाला धुक्क्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. या कारमधून चार जण प्रवास करत होते. यामधील तीन तरूणांचा कारमध्ये पाणी शिरून बुडून मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. या बेपत्ता व्यक्तीचा रेस्क्यु टीमच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. हे चारही जण फिरायला निघाते होते, मात्र त्यांच्यासोबत अपघाताची घटना घडली आहे. (car crashed into neera deodhar dam three died and one is missing pure bhore story)
ADVERTISEMENT
पुणे शहरातील बाणेर आणि रावेत येथील रहिवासी असलेले चार जण बलेनो कारमधून फिरायला निघाले होते. पुण्याहून वरधा घाटातून शिरगावच्या दिशेने नीरा देवधर मार्गे महाडकडे जात असताना त्यांच्या कारला अपघात घडला. घटनास्थळी दाट धुके असल्यामुळे चालकाला अंदाज आला नाही आणि कार थेट 300 फुट खोल धरणात कोसळली होती. या कारमधून चार जण प्रवास करत होते. यामधील तीन जणांचा कारमध्ये पाणी शिरून धरणात बुडुन मृ्त्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. या बेपत्ता तरूणाचा आता रेस्क्यु टीमच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा : Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story
दरम्यान या तरूणांची ओळख पटली आहे. संकेत जोशी, अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिदे आणि हरीप्रीत (मुलगी) या अशी या चारही जणांची नावे असून हे सर्वही पुणे शहरातील बाणेर आणि रावेत येथील रहिवासी आहेत.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत तीन तरूणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बेपत्ता असलेल्या एका तरूणाचा शोध घेतला जात आहे.
हे वाचलं का?
पावसाळ्यात वरध घाटात वृक्ष उन्मळून पडेण, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा अनेक घटना घडत असतात. त्यामुळ वरधा घाट बंद करून ताम्हिनी घाटाचा पर्यात वाहनधारकांना दिला आहे. परंतू वरधा घाटातून प्रवास कमी वेळेत होत असल्यान अनेक जण हा धोकादायक मार्ग अवलंबत असतात.
हे ही वाचा : Buldhana Accident: अमरनाथहून परतणाऱ्या बसची समोरासमोर धडक, 5 जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT