टेन्शन वाढलं! 24 तासात 7 जणांचा मृत्यू, 2700 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात एका दिवसातच...

मुंबई तक

Corona Latest Update : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार,देशात कोव्हिड-19 चे सक्रिय रुग्णांची संख्या 2710 वर पोहोचली आहे.

ADVERTISEMENT

कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ
कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने का वाढतेय?

point

मागील 24 तासात महाराष्ट्रात किती रुग्ण आढळले?

point

कोरोनाच्या रिपोर्टबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Corona Latest Update : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार,देशात कोव्हिड-19 चे सक्रिय रुग्णांची संख्या 2710 वर पोहोचली आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीत रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळमध्ये 1147 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात 424 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

30 मे सकाळी आठ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूत 148-148 रुग्णांची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 116 रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात 7 जणांचा मृत्यूही झाला आहे. तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय.

हे ही वाचा >> 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

महाराष्ट्रात 24 तासात किती रुग्ण आढळले?

दिल्लीत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय राजधानीमध्ये 24 तासात 77 रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळमध्ये 24 तासात 72 आणि महाराष्ट्रात नव्या 34 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. मागील आठवड्यात (25 मे पर्यंत) कोव्हिड रुग्णांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे गेली होती. केरळमध्ये सर्वात जास्त टेस्ट करण्यात आल्या. मिझोराममध्येही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय?

सूत्रांच्या माहितीनुसार,ओमिक्रॉनचे दोन नवे सब व्हेरिएंट - LF.7 आणि NB.1.8.1 ने टेन्शन वाढवलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये अचानाक झालेल्या वाढीला ये दोन व्हेरिएंट जबाबदार आहेत. तर JN. हा मुख्य व्हेरिएंट बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने LF.7 किंवा NB.1.8.1 ला धोकादायक व्हेरिएंट म्हणून घोषित केलं नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp