22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे
Pune Crime News : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अल्पवयीन मुलांनी एक दोन नायतर तब्बल 22 गाड्या फोडल्या. तरुण हे अल्पवयीन असल्याने त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट होताना दिसतंय

अल्पवयीन मुलांनी गाड्या फोडल्याने त्याची शिक्षा त्यांचे आई वडील भोगत आहेत
Pune Crime News : पुणे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीने कहर केला आहे. यामुळे पुण्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. मात्र, अल्पवयीन तरुणांच्या भाईगिरीची शिक्षा त्यांच्याच आई वडिलांना भोगावी लागत आहे. अशीच एक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे. काही अल्पवयीन मुलांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. त्याची शिक्षा त्यांचे आई वडील भोगावी लागत आहे.
आम्हीच या भागातील भाई, असं म्हणत अल्पवयीन मुलांनी एक दोन नायतर तब्बल 20 ते 22 वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. अशावेळी पोलिसांनी घटनास्थळी असणारं दारूचं हॉटेल आणि बार बंद करण्यास सांगितले. सिंहगड रोड येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
सिंहगड रस्त्यावर दारुच्या नशेमध्ये अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करणारं हॉटेल आणि बारही पोलिसांनी सील केले. तसेच अल्पवयीन मुलांचे आई वडील हे सहआरोपी आहेत.
अल्पवयीन मुलांनी मद्यपान करत हे कृत्य केले आहेत. नशेच्या भरात आपण नेमकं काय करतोय? असा प्रश्नही त्यांना पडला नाही. त्यांनी नशेच्याभरात दहशत माजवत तब्बल 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. 'आम्हीच या भागातील बाई' असे ओरडून कांगावा केला. दहशत माजवली. मात्र, त्यांच्या या कृत्याचे भोग त्यांच्याच आई वडिलांना भोगावे लागत आहेत.
या एकूण प्रकरणात सिंहगड रोड पोलीस ठाणे परिसरात अल्पवयीन मुलाचे वडील धर्मा सरोदे तर दुसऱ्या एका अल्पवयीन तरुणाच्या आईवर जे.जे. 77 कलमअंतर्गत, बारचे मालक तसेच मॅनेजर अनिल विनायक सुर्यवंशी, बारकाऊंटर, तर मद्यविक्रेता कालिदान नायकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.