पोट दुखतं म्हणून तपासणी केली, 10 वीच्या मुलीच्या पोटात आढळली 210 सेंटीमिटरची...

मुंबई तक

गेल्या अनेक दिवसांपासून ही सवय असलेल्या मुलीला महिनाभरापासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. तपासणीत तिच्या पोटात बेंबीपासून ते पोटाच्या वरच्या उजव्या भागापर्यंत पसरलेली एक भली मोठी गाठ आढळली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीला अनेक दिवसांपासून होती दोरा, लाकूड खाण्याची सवय

point

पोटात तयारी झाली भली मोठी केसांसारखी गाठ

Trichobezoar Surgery : लहान मुलांना माती किंवा पेन्सिल खाण्याची सवय असल्याचं अनेकदा आपण पाहतो. शरिरात कॅल्शियमची कमी असल्यानंतर अशी लक्षणं दिसतात असं सांगितलं जातं. मात्र, एखादी मुलगी जर माती, खडू, दोरा, लाकूड अशा गोष्टी खाते म्हटल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. धक्कादायक म्हणजे या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी जगातली सर्वात मोठी गाठ काढल्याचा दावाही केला आहे.  

हे ही वाचा >> 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

मुलीला होता 'हा' आजार...

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात ही मोठी कामगिरी केली आहे. 14 वर्षीय मुलीच्या पोटातून भली मोठी गाठ डॉक्टरांनी यशस्वीपणे काढली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बरारा गावातील ही 10वीच्या वर्गात शिकणारी मुलगी एका असामान्य मनोवैज्ञानिक आजाराने ग्रस्त होती, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘पिका’ म्हणतात. या आजारामुळे ती खडू, दोरा, माती आणि लाकडाचे तुकडे खात होती. 

कसं कळलं पोटात एवढी मोठी गाठ?

गेल्या अनेक दिवसांपासून ही सवय असलेल्या मुलीला महिनाभरापासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. तपासणीत तिच्या पोटात बेंबीपासून ते पोटाच्या वरच्या उजव्या भागापर्यंत पसरलेली एक भली मोठी गाठ आढळली.

शस्त्रक्रियेत चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स असलेले डॉ. कांकरिया म्हणाले की, जेव्हा बाहेर काढलेल्या गाठीचं मोजमाप केलं,  तेव्हा त्याची लांबी 210 सेमी असल्याचं आढळून आलं. हा आजपर्यंतचा जगातील सर्वात लांब ट्रायकोबेझोअर मानला जातो. याच्या आधीचा विक्रम 180 सेमीचा होता. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?