Pune : बंदुकीचा नाद जीवावर बेतला! मुलानं खेळता खेळता गोळी फायर केली अन् भावाला लागली, 20 वर्षीय मुलगा...

मुंबई तक

वैभव आपल्या वाढदिवसानिमित्त दुचाकीवरून पांढरे मळा कालवा परिसरात जात होता. यावेळी त्याचा चुलत भाऊ सुमित खवळे याने खेळा नादात अवैधरित्या बाळगलेल्या देशी पिस्तूलातून हवेत गोळी झाडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाढदिवसाला निघाला होता भाऊ!

point

चूलत भावानं खेळता खेळता फायर केली गोळी

point

बंदुकीतून निघालेली गोळी थेट चुलत भावाला लागली

Pune Crime News : गुरुवारी रात्री हडपसर परिसरातील पांढरे मळा कॅनॉलजवळ एक धक्कादायक घटना घडल. लहान मुलांनी खेळता खेळता मस्करीत पिस्तूल चालवलं, पण यातून खरंच  गोळी सुटली आणि 20 वर्षीय मुलाला लागली. या घटनेनं सगळेच हादरले आहेत.

हे ही वाचा >> 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

बंदुकीतून सुटलेली गोळी वैभव श्रवण गवळी याच्या खांद्याला लागली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.

हे ही वाचा >> 40 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय, थेट धारदार शस्त्राने केले वार अन्...​​

कशी घडली घटना? 

वैभव आपल्या वाढदिवसानिमित्त दुचाकीवरून पांढरे मळा कालवा परिसरात जात होता. यावेळी त्याचा चुलत भाऊ सुमित खवळे याने खेळा नादात अवैधरित्या बाळगलेल्या देशी पिस्तूलातून हवेत गोळी झाडली. मात्र, ही गोळी चुकून वैभवच्या डाव्या खांद्याला लागली. या घटनेत वैभव गंभीर जखमी झाला.

जखमी वैभवला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थीर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हडपसर पोलिसांनी सुमित नावाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडे अवैध पिस्तूल कुठून आलं आणि या गोळीबारामागील कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासाला सुरुवात केली आहे.