40 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय, थेट धारदार शस्त्राने केले वार अन्...
Pune Crime : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने राज्यात रान पेटलं आहे. नुकत्याच या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे करण्यात येत आहे. तसेच वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात आहे. अशीच एक घटना ग्रामीण पुण्यातील बारामतीच्या बांदलवाडीत घडली आहे. पतीने आपल्याच पत्नाच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला धारदार शस्त्राने हल्ला करत मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने राज्यात रान पेटलं

ष्णवीच्या चारित्र्यावरही संशय घेतला जातोय

अशातच पुणे जिल्ह्यातही एका आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला
Pune Crime : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने राज्यात रान पेटलं आहे. नुकत्याच या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे करण्यात येत आहे. तसेच वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात आहे. अशीच एक घटना ग्रामीण पुण्यातील बारामतीच्या बांदलवाडीत घडली आहे. पतीने आपल्याच पत्नाच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला धारदार शस्त्राने हल्ला करत मारहाण केली. महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशातच मृत महिलेच्या बहिणीने आरोपीवर पोलीस ठाण्यात जाऊन फर्याद नोंदवली आहे. दरम्यान ही घटना 25 मे रोजी घडली आहे.
हेही वाचा : 40 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय, थेट धारदार शस्त्राने केले वार अन्...
आरोपी पतीचे नाव हे लहू रामा वायकर असे आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत महिलेचं नाव संजना लहू वायकर असून महिलेचं वय वर्षे हे चाळीस होते. महिलेच्या उतरत्या वयात पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. या कृत्यामुळे आता पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या करणाने हा वाद निर्माण झाला होता. पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार शस्त्राने मारहाण केली. ही घटना बारामतीतील बांदलवाडी या ग्रामीण भागातील आहे. या प्रकरणाविरोधात बारामती पोलीस ठाणे परिसरात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी रात्री 9 वाजता बांदलवाडी येथे संजना लहु वायकर वय 40 वर्षे, बांदलवाडी ता. बारामती जि. पुणे मृत महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. दरम्यान, ससून रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : काठीने तरूणाला मारहाण, शूटींग करणारा म्हणतो मारू द्या... नव्या व्हिडीओमुळे बीडमध्ये खळबळ
संजना वायकरवरती केलेल्या हल्ल्यात तिच्या शरीरावरील अनेक भागांवर वार झाले आहेत. संजनच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत. कपाळ आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरुपाचे वार करण्यात आले आहेत. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या विरोधात लहू वायकरवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी लक्ष्य घालत पुढील तपास सुरू ठेवला आहे.