काठीने तरूणाला मारहाण, शूटींग करणारा म्हणतो मारू द्या... नव्या व्हिडीओमुळे बीडमध्ये खळबळ
Beed Crime Aher Wadgaon : आनंद शिंदे हा टोळीचा प्रमुख आहे असं म्हणत, एकूण 16 जणांविरोधात मारहाण झालेल्या मुलाच्या आईने तक्रार दिली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आनंद मोतीराम शिंदे याने माझ्या मुलांना ठार मारण्याची उघड धमकी दिली असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

Beed Crime News : संतोष देशमुख प्रकरण, त्यानंतर समोर आलेलं गुन्हेगारीची जाळं आणि सतत घडणाऱ्या गुन्हांच्या घटनांमुळे बीड चर्चेत आहे. बीड तालुक्यातील आहेर वडगावमध्ये पुन्हा एक तशीच धक्कादाय घटना घडली आहे. आहेर वडगाव येथील तरुणाला थेट मंदिरातच मारहाण केल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याच्या शक्यता आहेत.
हे ही वाचा >> 16 वर्षीय मुलीने स्वत:ला संपवलं, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळलं ती गर्भवती, 17 वर्षीय मुलाने...
समोर आलेली घटना ही 27 मे रोजी ची आहे. व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. याविषयी मारहाण झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मारहाण झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीमा राजाराम रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात आशाबाई राजाराम रोहिटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
गावाच्या मंदिरात मोठा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ति हातात लांब लाकडी दांडा घेऊन मंदिराबाहेर एका व्यक्तिच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी त्याला अडवणाऱ्यांनाही तो धमक्या आणि धक्के देताना दिसतोय. बाहेर जात ही व्यक्ति पीडित तरूणाला मारहाण करते. यावेळी काहीजण त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात, तर काही मारू द्या म्हणत व्हिडीओ शूट करत आहेत.
हे ही वाचा >> नौदलाचा इंजिनीअर हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात फसून हेरगिरी करत थेट...
आईने दिलेल्या तक्रारीत काय आरोप?
आनंद शिंदे हा टोळीचा प्रमुख आहे असं म्हणत, एकूण 16 जणांविरोधात मारहाण झालेल्या मुलाच्या आईने तक्रार दिली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आनंद मोतीराम शिंदे याने माझ्या मुलांना ठार मारण्याची उघड धमकी दिली. तो अनेक वेळा प्रत्यक्षपणे आमच्या घरासमोर येऊन अश्लील भाषा, मारहाणीचा प्रयत्न आणि खून करण्याची खुलेआम धमकी देतो आहे. या बाबत माझ्या मुलांनी संबंधित पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी केल्या असून, पोलिसांना सर्व पुरावे व माहिती देण्यात आले आहेत. पण, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. हा प्रकार केवळ धमकीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष हत्या करण्याचा कट रचला जात आहे. आनंद मोतीराम शिंदे व त्याच्या साथीदारांनी माझ्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ते गटाने फिरतात, हातात शस्त्रासदृश वस्तू असतात आणि नेहमी दहशत माजवतात. या गंभीर कटात खालील व्यक्ती सहभागी असून, आनंद मोतीराम शिंदे या टोळीचा प्रमुख असून तो माझ्या मुलांना सोबत कटकारस्थान रचत आहेत असा आरोप आईने केला आहे.