नौदलाचा इंजिनीअर हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात फसून हेरगिरी करत थेट...
एटीएसच्या माहितीनुसार, हे प्रकरण नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालं. रवि वर्माचा फेसबुकवर प्रीती जायस्वाल नावाच्या महिलेशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांचं संभाषण पुढे व्हॉट्सअॅपवरही होऊ लागलं.
ADVERTISEMENT

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) एका हाय-प्रोफाइल हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये खासगी संरक्षण कंपनीत कार्यरत असलेल्या 27 वर्षीय कनिष्ठ सेवा अभियंता रवि वर्मा हा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलं. भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाने देशाच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका उघड केला आहे.
अभियंता कसा अडकला हनी ट्रॅपमध्ये?
हे ही वाचा >> पुतण्याचे काकीसोबत शारीरिक संबंध, निळ्या ड्रमला घाबरून पतीने घेतला भलताच निर्णय!
एटीएसच्या माहितीनुसार, हे प्रकरण नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालं. रवि वर्माचा फेसबुकवर प्रीती जायस्वाल नावाच्या महिलेशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांचं संभाषण पुढे व्हॉट्सअॅपवरही होऊ लागलं. त्यावेळी महिलेने वर्माशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. हळूहळू तिने वर्माच्या नोकरी आणि कार्यस्थळाबद्दल माहिती मिळवली आणि त्याला गुप्त माहिती शेअर करण्यास प्रवृत्त केलं.
नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत वर्माने बरीच गुप्त माहिती लीक केली अशी माहिती आहे. ती महिला आणि ‘सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीच्या सूचनांनुसार मुंबईतील प्रतिबंधित नौदल डॉकयार्डमध्ये असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजांचे आणि नौकांचे नाव आणि ठिकाणं यांसारखी गुप्त माहिती शेअर केली.
हे ही वाचा >> VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप
एटीएसला वर्माच्या संशयास्पद हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. चौकशीतून समोर आलं की, वर्मा दोन पाकिस्तानी गुप्तचर संचालकांच्या थेट संपर्कात होता. त्याने व्हॉट्सअॅपद्वारे संवेदनशील संरक्षण माहिती शेअर केली होती. ही माहिती राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील होती आणि ती लीक होणे देशासाठी मोठा धोका ठरू शकते.