VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप
बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात (Ankita Bhandari Murder Case) न्यायालयाने तिन्ही आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय तिघांनाही 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

ऋषिकेश (उत्तराखंड): बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात (Ankita Bhandari Murder Case) कोटद्वार जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. सुमारे 2 वर्षे 8 महिन्यानंतर हा निकाल आला आहे. न्यायालयाने या हत्या प्रकरणात माजी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य त्याचे साथीदार सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासोबतच तिघांनाही 50,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात हायप्रोफाइल लोकांची नावे आल्याने ही घटना चर्चेत आली. VIP लोकांची नावं समोर आल्यानंतर, या प्रकरणात अनेक वळणे आली. 500 पानांच्या आरोपपत्रासोबतच या प्रकरणात 97 साक्षीदारही सादर करण्यात आले.
कोर्टाने काय दिला निर्णय?
खरं तर, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सकाळी 10.30 वाजता कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या निर्णयावर लागले होते. सध्या तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांनाही 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात, पुलकित आर्यवर IPC कलम 302 (खून), 201 (पुरावे नष्ट करणे), 354 A (लैंगिक छळ) आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याच वेळी, इतर दोन आरोपींवर हत्येत मदत करणे आणि अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
97 साक्षीदार - 500 पानांचं आरोपपत्र
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT(विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली होती. SIT ने 500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या संपूर्ण घटनेत 97 साक्षीदारांची नावे देखील होती, त्यापैकी सरकारी वकिलांनी त्यांच्या वतीने 47 साक्षीदार सादर केले होते.










