पुतण्याचे काकीसोबत शारीरिक संबंध, निळ्या ड्रमला घाबरून पतीने घेतला भलताच निर्णय!

मुंबई तक

Married Woman Viral Love Story : पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यावर नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

Extra Marital Affaire Viral News
Extra Marital Affaire Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकीला पुतण्यासोबत रंगेहाथ पकडलं, नंतर घडलं भयंकर

point

पतीला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत समजलं आणि...

point

पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?

Married Woman Viral Love Story : पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यावर नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्येही असंच काहीसं घडलं आहे. एका पतीला त्याच्या पत्नीचे (काकी) पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही..

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पतीला कळलं, त्यानंत महिलेचा पती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे त्याने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यानंतर पतीने असं काही केलं जे पाहून पोलिसही थक्क झाले. पतीने त्याची तीन मुलं आणि त्याच्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराकडे सोपवला. 

नेमकं घडलं तरी काय?

बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगढ परिसरातील फतेहगढ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत कळलं. पत्नीचे प्रेमसंबंध तिच्या पुतण्यासोबत सुरु असल्याने पतीलाही मोठा धक्का बसला. महिलेच्या प्रियकराचं घर तिच्या घराच्या शेजारीच होतं. महिला आणि तिच्या पतीला तीन मुलं आहेत. एक दिवस पतीने त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला विचित्र अवस्थेत पाहिलं.

हे ही वाचा >> शिक्षिका औषध घेऊन गेली अन् नको ते होऊन बसलं, शिक्षकाने केला भलताच कांड!

त्यानंतर पती आणि पत्नी दोघंही घाबरले. पण पतीने कोणत्याच प्रकारचा वाद केला नाही. पती पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तिथे पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यानंतर पतीने पत्नीसोबतचे सर्व संबंध तोडले आणि पत्नीला प्रियकरासोबत राहायला सांगितलं. इतकच नव्हे तर पतीने या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. 

पत्नीच्या भीतीने घेतला हा निर्णय?

कुटुंबियांनी संपूर्ण घटनेबाबत मोठा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पत्नी नेहमीच पतीला जीवे मारण्याची धमकी द्यायची. ती म्हणायची, मेरठच्या मुस्कानसारखं प्रकरण करून पतीला मारून टाकेन आणि निळ्या ड्रममध्ये भरेल. पत्नीच्या या धमक्यांमुळे पती खूप घाबरला होता आणि त्याला धक्का बसला.  

हे ही वाचा >> आरारा... 'RCB चा पराभव झाला तर मी नवऱ्याला घटस्फोट देणार', महिलेचा VIDEO तुफान व्हायरल

हे वाचलं का?

    follow whatsapp