शिक्षिका औषध घेऊन गेली अन् नको ते होऊन बसलं, शिक्षकाने केला भलताच कांड!
दिल्लीतील सटे गुरुग्राममधील शाळेतील एका सहकाऱ्याकडून सलग 4 वर्षे ब्लॅकमेल करुन शिक्षिकेसोबत वाईट कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिल्लीतील गुरुग्राममधील शाळेच्या शिक्षिकेवर सहकाऱ्याकडून अत्याचार

सलग 4 वर्षे ब्लॅकमेल करून लुटली अब्रू

शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना
Crime news: दिल्लीतील सटे गुरुग्राममध्ये एक खळबळजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तिथल्या शाळेतील एका सहकाऱ्याकडून सलग 4 वर्षे ब्लॅकमेल करुन शिक्षिकेसोबत वाईट कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने शिक्षकेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले होते, ज्याच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता आणि वर्षानुवर्षे तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे.
शिक्षिकेने केली तक्रार
महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून भोंडसी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करतेवेळी एका खाजगी शाळेत शिक्षिका असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं. या शाळेत 2021 मध्ये मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी अजित प्रताप कुशवाह काम करत होता. सध्या ते भोंडसी परिसरातील भिवानी एन्क्लेव्ह कॉलनीत राहतो.
हे ही वाचा: Honey Trap: तरुणीच्या जाळ्यात अडकला अन्.. ठाणे शहरातून पाकिस्तानला गोपनीय माहिती देणारा तो तरूण कोण?
घरी बोलवलं अन् कोल्ड्रिंकमध्ये...
शाळेत कामानिमित्त बोलत असताना त्या दोघांमध्ये मैत्री झाली. 6 नोव्हेंबर 2021 रोजी आरोपी अजित प्रताप कुशवाहने तिला फोन करून त्याची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं. यावर ती अजितसाठी औषध घेऊन त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी अजितने कोल्ड्रिंकमध्ये काही मादक पदार्थ मिसळल्याचा आणि तिला ते प्यायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा: 6 वर्ष अफेअरनंतर लग्न.. पहिल्याच दिवशी पतीने सोडून दिलं, 'हे' गुपित आलं समोर अन्..
अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल
इतकेच नव्हे तर त्याने महिला शिक्षिकेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले. यानंतर अजितने तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.