6 वर्ष अफेअरनंतर लग्न.. पहिल्याच दिवशी पतीने सोडून दिलं, 'हे' गुपित आलं समोर अन्..
Marriage Life : एका ऑस्ट्रेलियन महिलेने रेडिओ शोच्या दरम्यान तिने आपल्या आयुष्याची कथाच सांगितली. 6 वर्षे तरुणासोबत नातेसंबंधात राहूनही विवाहानंतर तिचा होणारा पती भर मंडपातून पळून गेला. याचं कारणही आश्चर्यचकीत करणारं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सहा वर्षे डेट करणारा पती गेला पळून
हनीमून दिवशी पत्नी होती एकटीच
एफएम रेडिओच्या माध्यमातून तरुणीने सांगितली मनातील सल
Marriage Life: एका ऑस्ट्रेलियन महिलेने रेडिओ शोच्या दरम्यान आपल्या आयुष्याची कथा सांगितली. 6 वर्षे तरुणासोबत नातेसंबंधात राहूनही विवाहानंतर तिचा होणारा पती भर मंडपातून पळून गेला. याचं कारणही आश्चर्यचकीत करणारं आहे. आता हेच कारण तरुणीने सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियन महिलेनं खुलासा केला की, ती एका तरुणासोबत गेली 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. मात्र, तिच्या होणाऱ्या पतीने कशाचाही विलंब न करता त्या नात्यावर पाणी सोडलं आणि तो तिला सोडून निघून गेला. संबंधित महिलेचं नाव हे काइली असे आहे. तिनं सांगितलं की, तिनं अशा परिस्थितीला तोंड दिल्याने ती हैरान झाली.
हेही वाचा : गुरूचा 'या' राशीत प्रवेश, पाहा कसं असेल तुमचं राशीभविष्य!
कइलीने सांगितलं की, आमच्या विवाहाचे अगदी साध्या पद्धतीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आमच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी अनेक फोटोशूट केले होते. अशावेळी तो खूपच सुंदर दिसत होता. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकारे निखळ प्रेमाचा झराच होता. मात्र, आमच्या नात्याला कोणाची नजर लागली? आमचं नातं काही क्षणार्धात निसटून गेलं आहे.










