Buldhana Accident: अमरनाथहून परतणाऱ्या बसची समोरासमोर धडक, 5 जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

buldhana two private travel bus accident 5 people dead 24 injured
buldhana two private travel bus accident 5 people dead 24 injured
social share
google news

Buldhana Accident: ज़का खान, बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident) झाला असून, दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन तब्बल 5 जणांचा  जागीच मृत्यू (5 death) झाला असून 24 प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील मलकापूर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील लक्ष्मीनगर जवळील उड्डाण पुलावर आज (29 जुलै) पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. (buldhana two private travel bus accident 5 people dead 24 injured today news in maharashtra in marathi

अमरनाथ यात्रेहून हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन एक खासगी बस येत होती. तर दुसरी खासगी बस ही नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात होती. याच दोन्ही बसची अगदी समोरासमोर जोरदार धडक झाली. नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या बस चालकाने ओव्हरटेकिंग करण्याच्या प्रयत्न हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ज्यामध्ये तब्बल 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोन्ही खासगीमधील मिळून एकूण 24 प्रवासी हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story

नेमका कसा घडला अपघात?

MH-08-9458 ही ट्रॅव्हल बस अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 40 ते 45 यात्रेकरू होते, तर MH-27-BX-.4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवासी होते, ही ट्रॅव्हल्स नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्याहायवे क्रमांक सहावर समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nargis Delhi : भयंकर! मावशीच्या मुलीचा रॉडने गार्डनमध्येच पाडला मुडदा; कारण…

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ मदतकार्य सुरू केलं. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

बुलढाण्यात समृद्धी हायवेवरील अपघातात 25 जणांनी गमावलेला जीव

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये तब्बल 25 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर बसला जी भीषण आग लागली होती त्यामध्ये 25 जण अक्षरश: होरपळून निघाले होते.

ADVERTISEMENT

या अपघात प्रकरणी अमरावती आणि नागपूर परिवहन विभागाच्या अहवालात ड्रायव्हरच्या चुकांमुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अमरावती परिवहन विभागाच्या अहवालात, बुलढाणा बस दुर्घटना ही टायर फुटून झालेला नसल्याची माहिती देण्यात आली होती. तर हा अपघात ड्रायव्हरला डुलकी लागल्याने आणि नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचं अहवालात म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

अमरावतीसोबत नागपूर परिवहन विभागाचाही अहवालही समोर आला होता त्यातही अशाच स्वरूपाचा दावा करण्यात आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT