चादर गुंडाळूनच बाहेर पडली, बोलवावी लागली रूग्णवाहिका; अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

American singer Britney Spears : 'प्रिंसेस ऑफ पॉप' म्हणून ओळखली जाणारी अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स सध्या चर्चेत आहे. अलीकडेच ब्रिटनीचे धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित झाले होते, मात्र हे कुणीतरी मुद्दामुन केल्याचे ब्रिटनीने म्हटले आहे. (American singer Britney Spears reveals whole truth of her coming out topless from hotel in night says mom setup this )

ADVERTISEMENT

ब्रिटनीने या संपूर्ण घटनेबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की, 'हे तिच्या आईचे षड्यंत्र आहे, तिने यापूर्वीही माझी वाईट इमेज बनवण्यासाठी असा प्लान केला होता.'

ब्रिटनी हॉटेलमधून चादर गुंडाळून का बाहेर पडली?

आंतरराष्ट्रीय पॉप सेन्सेशन ब्रिटनी अलीकडेच लॉस एंजेलिसमधील Chateau Marmont हॉटेलमधून गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर पडताना दिसली. हॉटेलमधून बाहेर पडतानाचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ब्रिटनीने स्वत:ला चादरीने गुंडाळलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काहीजण असंही म्हणत आहेत की, ब्रिटनीचे तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये भांडण झाले होते. त्यामुळेच अशा अवस्थेत ती बाहेर आली.

हे वाचलं का?

हेही वाचा: 'तुम्ही पवारांबद्दल..' 'भटकती आत्मा'वरुन राहुल गांधींनी सुनावलं!

पॅरामेडिकल कर्मचारीही घटनास्थळी येताना दिसले, यावरून तिचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याच्या बातम्या बातम्या येऊ लागल्या. सोशल मीडियावर तिचे हे फोटो पाहून लोक हैराण झाले असतानाच लोक तिच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करू लागले. पॅरामेडिकल रुग्णवाहिका घेऊन हॉटेलमध्ये पोहोचले होते, परंतु ते रिकाम्या हाताने परतले.

ब्रिटनीने सांगितले संपूर्ण प्रकरण...

आता ब्रिटनीने सोशल मीडियावर म्हटले आहे की प्रकरण काहीतरी वेगळं आहे. पण बॉयफ्रेंडशी भांडण आणि मानसिक आरोग्याशी संबंधित येणाऱ्या बातम्यांमागे तिच्या आईचे षडयंत्र आहे. इंस्टाग्रामवरील एका नोटमध्ये ब्रिटनीने लिहिले की, तिच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न निर्माण करणाऱ्या या बातम्या खोट्या आहेत. ती म्हणाली, 'मी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे, यासाठी लोकांचा मी आदर करते. सत्य खूप वाईट आहे, मग कोणी मला खोटं कसं बोलायचं हे शिकवेल का?'

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

हेही वाचा: 'रात्री कट कारस्थानं करून माझं..', मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप

ब्रिटनीने पुढे लिहिले, 'मला हे शेअर करण्याची गरज का भासली हे माहीत नाही... पण मी एक मुलगी आहे आणि मासिक पाळीमुळे माझी चिडचिड होते. ब्रिटनीने तिचा पाय दाखवत एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, 'रात्री माझा पाय मुरगळला. मीच मूर्ख आहे, माझ्या लिव्हिंग रूममध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना मी पडले आणि माझा पाय मुरगळला. पॅरामेडिकलवाले बेकायदेशीरपणे तेथे पोहोचले आणि उगाचच गोंधळ निर्माण केला. तुम्हाला तर माहीतच आहे, कधी कधी अशा मूर्खपणाच्या गोष्टी घडतात.'

हेही वाचा: महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं 

ब्रिटनीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला माहित आहे की माझी आई यात सामील आहे. मी तिच्याशी 6 महिने बोलले नाही आणि ही बातमी येण्यापूर्वीच तिने मला फोन केला. ब्रिटनी म्हणाली की तिच्या आईने याआधीही अशा बातम्या बनवल्या होत्या.'

ब्रिटनीने सांगितले की, तिचे वकील मॅथ्यू रोसेनगार्ट यांनी तिला या परिस्थितीत मदत केली. तिने लिहिले, 'हा माणूस खरोखरच अप्रतिम आहे. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. त्यांनी रात्री मला या सगळ्यातून बाहेर काढले. यावेळी ब्रिटनी मध्यरात्री चादर गुंडाळून हॉटेलमधून बाहेर पडली, आता ती सुरक्षित असल्याची माहिती आहे. ब्रिटनीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असेही सांगितले की आता ती लॉस एंजेलिसहून बोस्टनला शिफ्ट होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT