परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरात मांसाहारी जेवण बनवलं, आरोप कुणावर? व्हायरल व्हिडीओमुळे तणाव

मुंबई तक

मंदिर परिसर हे पवित्र तीर्थस्थळ मानलं जातं आणि अशा ठिकाणी मांसाहारी जेवण बनल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाविकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरातील संतापजनक प्रकार

point

मंदिर परिसरात मांसाहारी जेवण बनवल्यानं तणाव

Beed Parali : परळीतील प्रख्यात प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात बांधकामावर काम करणाऱ्या काही कामगारांनी याच ठिकाणी मांसाहारी जेवण बनवल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती स्थानिक भाविकांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाने भाविकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

हे ही वाचा >> निर्वस्त्र अवस्थेत तरूणीचा मृतदेह, डोकं ठेचलेलं आणि शेजारी भाकरीचे तुकडे... वाशिमधील भयावह घटना काय?

मंदिर परिसर हे पवित्र तीर्थस्थळ मानलं जातं आणि अशा ठिकाणी मांसाहारी जेवण बनल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाविकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसंच, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर नियम आणि दक्षता घेण्याची मागणीही केली जात आहे.

हे ही वाचा >> कुणी चहा घेत होतं, कुणी गप्पा मारत होतं... कार आली आणि सर्वांना चिरडून गेली, सदाशिव पेठेत काय घडलं?

या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केल्याची माहिती आहे. भाविकांनी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp