Chandrayaan 3: मोठी बातमी: …तर चंद्रयानाचं लँडिंग 23 ऑगस्ट नाही तर ‘या’ दिवशी होणार!
जर आम्हाला वाटले की चंद्रावर लँडिंग करण्याची स्थिती चांगली नाही आहे,तर आम्ही चंद्रयानची लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू.पण तरीही 23 ऑगस्टला चंद्रयानला लँड करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा विश्वास देखील निलेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 Moon landing: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या चंद्रयान मोहिम यशस्वी होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत.येत्या 23 ऑगस्टच्या सांयकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.असे असतानाच आता चंद्रयानच्या लँडिंगवरून इस्त्रोच्या (ISRO) वैज्ञानिकांनी मोठी माहिती दिली आहे. (chandrayaan 3 moon landing if teachnical error postponing the landing till August 27 isro scientist)
ADVERTISEMENT
चंद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) लँडिंगच्या 2 तासाआधी इस्त्रोचे वैज्ञानिक चंद्रावरील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.चंद्रावरील परिस्थिती जाणून घेतल्यानंतरच चंद्रयान 3 च्या लँडिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे अहमदाबादचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.देसाई पुढे म्हणाले की,जर आम्हाला वाटले की चंद्रावर लँडिंग करण्याची स्थिती चांगली नाही आहे,तर आम्ही चंद्रयानची लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू.पण तरीही 23 ऑगस्टला चंद्रयानला लँड करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा विश्वास देखील निलेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :Chandrayaan 3 : पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे? जाणून घ्या 7 रंजक गोष्टी
इस्त्रोने वैज्ञानिक निलेश देसाई यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी हा खुलासा केला आहे. 23 ऑगस्टला 30 किलोमीटरच्या उंचीवरून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 1.68 प्रति सेकंद वेगाने उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी लँडर माड्यूलची टेस्ट केली जाणार आहे, तसेच चंद्रावरील परिस्थितीचाही देखील आढावा घेतला जाणार आहे.या सर्व गोष्टी केल्यानंतर साधारण 2 तासांनी चंद्रयानचे लँडिंग करायचे की नाही,याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
हे वाचलं का?
दरम्यान मला असे वाटतं नाही की अशी कोणतीही तांत्रिक संमस्या येणार आहे.पण जर आली तर आम्ही लँडिंग पुढे ढकलून 27 ऑगस्टला करू.यासाठीची आम्ही संपूर्ण तयारी देखील केली आहे, असे निलेश देसाई यांनी म्हटले आहे.
#WATCH चंद्रयान के चांद पर उतरने से 2 घंटे पहले हम लैंडर और चांद की स्थिति का जायजा लेंगे और उसके बाद लैंडर के चांद पर लैंड कराने पर फैसला लेंगे। अगर हमें लगेगा की लैंडर या चांद की स्थिति उतरने के लिए ठीक नहीं है तो हम इसे 27 अगस्त तक के लिए आगे बढ़ा देंगे। हम 23 अगस्त को लैंडर… pic.twitter.com/iS2MKnUkVY
— ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2023
ADVERTISEMENT
23 ऑगस्टला 30 किलोमीटरच्या उंचीवरून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 1.68 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. ही खूप गती आहे.यावेळी चंद्राचे गुरूत्वाकर्षण त्याला खालच्या दिशेने खेचणार आहे.अशावेळेस आम्ही थ्रस्टर इंजिनने रेट्रो फायर करणार आहोत. जेणेकरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लँडरची गती कमी केली जाईल. आणि हळुहळू चंद्राच्या पुष्ठभागावर पोहोचल्यावर त्याची गती शुन्य होणार आहे. यासाठी आम्ही लँडर माड्यूलवर चार थ्रस्ट फायर लावले आहेत. या थ्रस्ट फायरद्वारे लँडरची गती कमी केली जाणार आहे, असे निलेश देसाई यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Chandrayaan-3 Landing Live Update: भारत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, चंद्रयान 3 चं लँडिंग ‘इथे’ पाहा LIVE
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT