Chandrayaan 3 : पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे? जाणून घ्या 7 रंजक गोष्टी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission
chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission
social share
google news

Chandrayaan 3 landing Moons South Pole : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) इतिहास रचण्यापासून अवघे दोन दिवस दुर आहे. कारण चंद्रयान 3 येत्या 23 ऑगस्टला सांयकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे. चंद्रयान ज्या चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे,तो चंद्राचा दक्षिण ध्रुव असणार आहे. चंद्राच्या या दक्षिण ध्रुवाबाबतच्या 7 महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.या 7 गोष्टी जाणून घेऊयात. (chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission)

1) चंद्रयान 3 लँडरची प्राईम साईट

चंद्रावरील लँडर मा़ड्यूलची प्राईम साईट 4 किमी x 2.4 किमी 69.367621 एस,32.348126 ई आहे,अशी माहिती इस्त्रोने वेबसाईटवर दिली आहे.

2) लँडर दक्षिण ध्रुवावर उतरणार नाही

चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या नजीक मंजिनस-यू (Manzinus-U) क्रेटरजवळ उतरवण्यात येणार आहे. इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी सांगितले की, आम्ही चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवाजवळ उतरवत आहोत, दक्षिण ध्रुवावर नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

3) लँडर चंद्राच्या उतार भागात उतरणार

विक्रम लँडरला चंद्राच्या 12 डिग्रीवाल्या उतार भागात उतरवू शकतो. विक्रम लँडर ज्यावेळेस चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्यावेळेस त्याता वेग 2 मीटर प्रति सेंकदच्या आसपास असणार आहे. आणि हॉरीझोंटल वेग 0.5 मीटर प्रति सेकंद असणार आहे.

ADVERTISEMENT

4) 200 अंश सेल्सिअस तापमान

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचे तापमान 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती किंवा मायनस 200 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक असते. चंद्राचा हा भाग पृथ्वीच्या दक्षिणी ध्रुव अंटार्कटीकाप्रमाणे ठंड असल्याचे बोलले जाते.

ADVERTISEMENT

5) पाण्याची होणार चाचणी

चंद्रयान 3 चंद्राच्या ज्या पृष्ठभागावर उरणार आहेत, तिकडे पाणी बर्फाच्या स्वरूपात आढळणार आहे. या पाण्याची चाचणी करण्यात येणार असून ते किती उपयोगाचे आहे, याचा तपास केला जाणार आहे.

6)चंद्रावर कुठे खड्डे, कुठे मैदाने

चंद्रयान 3 च्या विक्रम लँडरमध्ये लावण्यात आलेल्या लँडर हजार्ड डिटेक्शन अँड अवॉयडेंस कॅमेरा (Lander Hazard Detection And Avoidance Camera-LHDAC)ने नुकतेच चार फोटो पाठवले होते. या फोटोत चंद्रावर अनेक ठिकाणी खड्डे,तर अनेक ठिकाणी मैदानी परीसर दिसला होता. चंद्रावरील जमीन ही खडबडीत आहे.

7) पाणी किंवा बर्फाव्यतिरीक्त ही गोष्ट सापडणार

नासाच्या म्हणण्यानुसार चंद्रावर पाणी किंवा बर्फाच्या व्यतिरीक्त नैसर्गिक संसाधने आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नैसर्गिक संसाधनाचा मनुष्याला किती फायदा किंवा नुकसान होणार आहे, हे तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT