Narayan Rane : ''रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या...राणे शिवसेनेत असेपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही''; राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Narayan Rane shocking secret expolosion Rashmi Thackeray : मी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जेवढी काही पदे निर्माण झाली, त्या सगळ्या पदावर साहेबांनी मला पाठवलं, उद्धवला का नाही पाठवलं? कारण क्षमता नव्हती, असा टोला देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर लगावला.
ADVERTISEMENT
Narayan Rane shocking secret expolosion Rashmi Thackeray : 'बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा त्याला (उद्धव ठाकरेला) पोटदुखी झाली होती. त्यावेळी रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या, ''राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही'',असा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे रश्मी ठाकरेंबाबत केला आहे. राणेंच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (narayan rane shocking secret expolosion rashmi thackeray udhhav thackeray balasaheb thackeray lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
नारायण राणे एका कार्यक्रमात बोलत होते. ''शिवसेना इथपर्यंत न्यायला माझ्यासारखे सैनिक लागतात, त्यांची मेहनत लागते. मी कधी जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाचीही केली नाही. पण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा त्याला त्याला (उद्धव ठाकरेला) पोटदुखी झाली. तेव्हा पत्नी (रश्मी ठाकरे) म्हणायची उद्धवजींना ''राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही. पण यात माझा काय दोष होता, वडील त्याचे होते, त्यांनी मला पद दिले होते, असे नारायण राणे यांनी सांगितले.
हे ही वाचा : Narendra Modi : '...तर बाळासाहेबांना फार दु:ख झाले असते'
ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. त्यावेळी बाळासाहेबांना भेटायचा माझा रोजचा साडेसातचा वेळ असायचा. त्यावेळी मराठी माणूस आणि हिंदुत्व यासाठी नारायण आपल्याला काम करायचे आहे, असे बाळासाहेब मला म्हणायचे. आणि मी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जेवढी काही पदे निर्माण झाली, त्या सगळ्या पदावर साहेबांनी मला पाठवलं, उद्धवला का नाही पाठवलं? कारण क्षमता नव्हती, असा टोला देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर लगावला.
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पारचा नारा दिला होता. मोदींच्या या घोषणेवर ठाकरेंनी अब की बार भाजप तडीपार अशी टीका केली होती. अरे तुझ्याकडे खासदार किती आहेत. पाचच खासदार आहेत, या निवडणूकीनंतर शुन्य राहणार आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला.
हे ही वाचा : अजित पवार, अशोक चव्हाणांवरुन खरगेंचा PM मोदींना टोमणा
ठाकरेंना घरात कोडून ठेवलं
अतिशय विचित्र व्यक्तिमत्व, दिसतंय भोळं पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास. उद्धव ठाकरेंना घरात कोंडून ठेवलं होतं. नवऱ्याला घरात कोडून ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचं, त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्यामागचं आईचं कारण होतं.मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा आईचा प्लान होता, असा खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT