कल्याण : ‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’, अनैतिक संबंधातून दीराने केली वहिनीची हत्या

मिथिलेश गुप्ता

Kalyan Crime News : कल्याणमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून दीराने वहिनीची हत्या केली आहे. वहिनीने बोलणं बंद केल्याचा राग मनात धरुन दीराने हे कृत्य केलंय.

ADVERTISEMENT

Kalyan Crime News
Kalyan Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण : ‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’,

point

अनैतिक संबंधातून दीराने केली वहिनीची हत्या

Kalyan Crime News : वहिनी ही आईसमान असते असं म्हटलं जातं. मात्र, कल्याणमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून एका महिलेची तिच्याच दिराने डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपासून बोलणं बंद केल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला थेट झारखंडमधून अटक केली असून, अवघ्या 20 मिनिटांचा उशीर झाला असता तर आरोपी नेपाळमध्ये फरार झाला असता.

हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकावर कोयत्याने वार, कात्रज-नवले पुलावरुन फेकलं, वादाचं कारण समोर!

वहिनीने बोलणं बंद केल्याने दीराकडून वहिनीची हत्या 

कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या गुड्डू देवी या महिलेला 27 एप्रिल रोजी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना 11 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, खडकपाडा पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. मृत महिला आणि तिचा दीर बम बम कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं तपासात उघड झालं. काही दिवसांपासून महिलेने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं. याच कारणावरून आरोपी तिच्या घरी पोहोचला आणि दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने महिलेचे डोके भिंतीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली.

हेही वाचा : कामावरुन घरी पोहोचला, बायको घरात यूट्यूबरसोबत दिसली अन् भयंकर कांड!

हे वाचलं का?