नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!

मुंबई तक

Crime News : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पीडितेने मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार

point

NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!

Crime News : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेली ही विद्यार्थिनी महोबा शहरात राहून नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होती. गेल्या 30 एप्रिल रोजी कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना कारमधून आलेल्या काही गुंडांनी तिचे अपहरण केले होते. या घटनेनंतर तब्बल 16 दिवसांनी पोलिसांनी या विद्यार्थिनीचा शोध घेतला असून तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : नांदेड : मुलीसाठी पेपर विकत घेतला, CBI कडून 8 तास घराची झाडाझडती, 'तो' माणूस नेमका कोण?

अर्धा डझन आरोपींच्या मदतीने कोंडून ठेवले

पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलेली आपबीती अत्यंत अंगावर काटा आणणारी आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्याच गावातील मोहित श्रीवास याने अंकित श्रीवास आणि हल्लू राजपूत यांच्यासह सुमारे अर्धा डझन आरोपींच्या मदतीने तिला प्रयागराज येथे कोंडून ठेवले होते. या दरम्यान तिला दर दोन तासांनी नशा देणारे इंजेक्शन दिले जात होते आणि मोहितने तिच्यावर बलात्कार केला. या कृत्याला विरोध केला असता नराधमांनी तिला सिगरेटचे चटके दिले आणि चाकूने वार केले, तसेच तिच्या भावाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मोहितने तिच्याशी जबरदस्तीने लग्नही केले. आता ही पीडिता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची आणि दोषींना फाशी देण्याची मागणी करत आहे.

हेही वाचा : बीड : स्वराती मेडिकल कॉलेजमधील भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?