कामावरुन घरी पोहोचला, बायको घरात यूट्यूबरसोबत दिसली अन् भयंकर कांड!
Crime News : गावात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिला तिच्या कथित युट्यूबर असलेल्या प्रियकरासोबत घरात बसली होती, नंतर अचानकपणे तिचा नवरा घरी परतला असता, मोठा विवाद झाला. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झालेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने ओळखीच्या माणसाला घरी बोलावले
घरातील दृश्य पाहताच नवऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात
Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील झंगहा पोलीस ठाणे क्षेत्रातील पपरपाती गावात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिला तिच्या कथित युट्यूबर असलेल्या प्रियकरासोबत घरात बसली होती, नंतर अचानकपणे तिचा नवरा घरी परतला असता, मोठा विवाद झाला. या विवादाचे रक्तरंजित स्वरूपात रूपांतर झाले असता, या प्रकरणात दोघेजण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
हे ही वाचा : 10000 अश्लील व्हिडीओ, 40000 फोटो.., टेलीग्रामवरुन विक्री, बँक खात्यात डोळे विस्फारणारी रक्कम!
माहितीनुसार, जितेंद्र निषाद तामिळनाडू येथे नोकरी करत होता. तो आपल्या कुटुंबापासून दूर राहत होता. त्यांचा विवाह हा 10 वर्षांपूर्वी गुंज देवी नावाच्या तरूणीसोबत झालं होतं, तसेच त्यांना दोन लहान मुले देखील आहेत. जितेंद्र हे 15 दिवसांपूर्वी तमिळनाडूहून आपल्या गावी परतले होते. मात्र, त्याला गोष्टीची किंचितशीही जाणीव नव्हती.
पत्नीने ओळखीच्या माणसाला घरी बोलावले
रविवारी 17 मे रोजी शाम गुंज देवीने आपल्या ओळखीच्या कुलदीप शर्मा नामक व्यक्तीला बोलावले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, एक युट्यूबर नजीकच्याच गावात राहत होता. रात्री 5 वाजता कुलदीप ऑटोहून घरी परतली होती, ती एका खोलीत बसली होती. त्याचदरम्यान, जितेंद्र अचानकपणे घटनास्थळी दाखल झाला होता, त्यानंतर एकूणच परिस्थिती बिघडून गेली होती.
घरातील दृश्य पाहताच नवऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात
जितेंद्रने घराचा दरवाजा खोलताच घरातील दृश्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आरोप करण्यात येतो की, त्याने घरात ठेवलेलं हत्यार घेऊन कुलदीपवर हल्ला केला. या हल्ल्यात गळा आणि कानावर मोठी गंभीर जखम झाली. यानंतर पत्नी गुंजा देवीवर देखील लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला होता, तिच्या डोक्यावर गंभीर जखम झाली.









