नवविवाहितेनं 'त्या' कारणामुळे संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये नवऱ्याविषयी काय लिहिलं?
भरतपूर जिल्ह्यातील एका नवविवाहितेसोबत भयंकर घटना घडली. दहा महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर नेमकं असं काय घडलं की तिला आपलं जीवन संपवावसं वाटलं, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवविवाहितेनं 'त्या' कारणामुळे संपवलं जीवन
सुसाईड नोटमध्ये नवऱ्याविषयी काय लिहिलं?
Crime News : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील लक्ष्मी नगर कॉलनीमध्ये लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांत सुकुर्ती यादव या नवविवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर फॉरेन्सिक (FSL) टीमने घटनास्थळी पोहोचून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरबीएम रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. घटनेची माहिती मिळताच मृत नवविवाहितेचे वडील राकेश कुमार यांनी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांच्या लहान मुलीने फोनवरून दिलेल्या माहितीच्या आधारे सुकुर्तिचा सासरच्या लोकांनी खून केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
लग्नाच्या दहा महिन्यांतच काय घडलं?
याप्रकरणी मृतकेचे वडील राकेश कुमार यांनी सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा आणि छळाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 10 महिन्यांपूर्वी आपल्या दोन्ही मुलींचे लग्न प्रशांत यादव आणि त्याच्या लहान भावाशी केले होते. लग्नानंतरपासूनच सुकुर्तीचा सासरी छळ केला जात होता आणि तिच्याकडे स्कॉर्पिओ गाडी तसेच पैशांची मागणी केली जात होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. अनेकदा पैसे देऊनही सासरच्या लोकांची मागणी सुरूच होती आणि याच त्रासाला कंटाळून किंवा त्यातूनच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
हे ही वाचा : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, पुण्यातून कोणाला संधी?
संशयाने सर्वकाही उद्ध्वस्त
दुसरीकडे, घटनास्थळावरून पोलिसांना दोन पानांची सुसाइड नोट सापडली आहे, जी या तपासातील महत्त्वाचा दुवा मानली जात आहे. या चिठ्ठीत सुकुर्तिने तिच्या आणि पतीच्या नात्याबद्दल लिहिले असून पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेल्याचा उल्लेख आढळतो. "एका संशयाने सर्वकाही उद्ध्वस्त केले," असे लिहीत तिने आपल्या मृत्यूस स्वतःलाच जबाबदार धरले आहे. तिने पतीला दोष न देता, सर्वकाही ठीक करण्याच्या प्रयत्नात स्वतःकडून गोष्टी बिघडल्याचे म्हटले आहे. पतीसोबतचे नाते मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ होते, परंतु संशयामुळे हे नाते संपल्याची खंत तिने पत्रात व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये भरती, जाणून घ्या पात्रतेचे निकष
हुंडाबळीचे आरोप अन् सुसाईड नोटमध्ये तफावत
सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृतकेच्या वडिलांनी केलेले हुंडाबळीचे आरोप आणि सुसाइड नोटमधील मजकूर यात मोठी भिन्नता दिसून येत असल्याने पोलीस या दोन्ही पैलूंची बारकाईने पडताळणी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक पुरावे, सुसाइड नोट आणि नातेवाईकांचे जबाब यांच्या आधारे सुकुर्तिच्या मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
