भाडेकरु महिलोसोबत शरीरसंबंध अन् दोन भावांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका भाडेकरू महिलेशी जवळचे संबंध असलेल्या दोन चुलत भावांच्या मृत्यूमुळे बिजनोरमध्ये खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भाडेकरु महिलोसोबत शरीरसंबंध अन् दोन भावांचा मृत्यू

point

गावकऱ्यांमध्ये घबराट

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर शहराला लागून असलेल्या एका गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे दोन वर्षे परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका महिलेशी जवळचे संबंध आल्यानंतर दोन चुलत भावांचा आजारपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. तपासात या दोन्ही भावांना एचआयव्ही (HIV) संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी 51 वर्षीय भावाचा तीन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊन मृत्यू झाला, तर त्याच्यापाठोपाठ 43 वर्षीय चुलत भावानेही बुधवारी रात्री उपचारादरम्यान दम तोडला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या मृत्युमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अवघ्या तीन दिवसांत दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दोन वर्षे परिसरात भाड्याने राहत होती. सर्वप्रथम 51 वर्षीय व्यक्तीचे तिच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर त्याच्या 43 वर्षीय चुलत भावाचेही तिच्याशी संबंध आले. ही महिला घर सोडून गेल्यानंतर मोठ्या भावाची प्रकृती वेगाने बिघडू लागली. स्थानिक पातळीवर उपचार करूनही फरक न पडल्याने नातेवाईकांनी त्याला एम्स ऋषिकेश येथे दाखल केले, जिथे चाचणीदरम्यान त्याला एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेच्या अवघ्या तीन दिवसांतच 43 वर्षीय चुलत भावाचाही एचआयव्ही संसर्गामुळे मृत्यू झाला.

हे ही वाचा : लिंगबदल शस्त्रक्रियेला आईचा विरोध, 17 वर्षीय मुलाकडून क्रूरपणे हत्या

त्या लोकांमध्ये घबराट

दरम्यान, या महिलेच्या घरी इतरही अनेकांची सातत्याने ये-जा असायची. दोन भावांचा एचआयव्ही संसर्गाने मृत्यू झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी चिंताग्रस्त झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. कौशलेंद्र सिंह यांनी गावात आरोग्य विभागाचे पथक पाठवून समुपदेशन करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शंका असलेल्या नागरिकांना पुढे येऊन तपासणी करण्यासाठी प्रेरित करता येईल.

हे ही वाचा : 'माझ्यावर वार होत होते पण...', भारताचा ढाण्या वाघ कॅप्टन स्मितने PM मोदींना Video Call वर सांगितला सगळा थरार!

आरोग्य तज्ज्ञांनी काय सांगितलं?

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना न घाबरता अधिकृत आरोग्य केंद्रात जाऊन गोपनीय पद्धतीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. एचआयव्ही संसर्गाची पुष्टी केवळ वैद्यकीय चाचण्यांद्वारेच केली जाऊ शकते. वेळेवर निदान आणि योग्य वैद्यकीय उपचार सुरू केल्यास एचआयव्ही संसर्ग प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो; त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता व न घाबरता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.