"तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो ते चुकलं का?", ओमराजे MPSC च्या विद्यार्थ्यांना असं का म्हणाले?

मुंबई तक

Omraje Nimbalkar : एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना पक्षबदलाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो ते चुकलं का?"

point

ओमराजे MPSC च्या विद्यार्थ्यांना असं का म्हणाले?

Omraje Nimbalkar mpsc students protest, पुणे : एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात याव्यात, या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, रविवारी (4 ऑक्टोबर) धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पक्षबदलाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी ‘ओमराजे परत या’ अशा घोषणा दिल्या, तर काहींनी गर्दीतून ‘गद्दार’ असा आवाज दिला.

हेही वाचा : 'तुम्हाला सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण...' राज ठाकरेंची तोफ धडाडली, थेट भाजपच्या माजी मंत्र्याची 'ती' गोष्ट सांगितली!

“मी कुठे गेलेलो नाही, मी इथेच आहे. मी लोकप्रतिनिधी आहे,”

विद्यार्थ्यांचा रोष पाहून ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पक्षबदलाच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली. “मी कुठे गेलेलो नाही, मी इथेच आहे. मी लोकप्रतिनिधी आहे,” असं म्हणत त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी असलेला संपर्क तुटलेला नसल्याचं सांगितलं. आपल्या मतदारसंघात पूर, दुष्काळ किंवा अन्य आपत्ती असताना आपण सामान्य माणसाची साथ सोडली नाही, असा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या अनेक उमेदवारांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, सत्ता नसल्याने त्या माध्यमातून काम करण्यात अडचणी आल्या आणि आपल्या लोकांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : 'रवींद्र चव्हाणही मंचेकर गँगचे सदस्य होते त्यांना...,' शिवसेना नेत्याचे गंभीर आरोप; महायुतीत महाभारत!