पुणे : रिक्षाचालकावर कोयत्याने वार, कात्रज-नवले पुलावरुन फेकलं, वादाचं कारण समोर!

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे जुन्या वादातून एका रिक्षा चालकावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

रिक्षाचालकावर कोयत्याने वार

point

कात्रज-नवले पुलावरुन फेकलं, वादाचं कारण समोर!

Pune Crime News : पुण्यात अक्षरश: कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवरील राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक येथे भरदिवसा एका रिक्षा चालकावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना 18 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज माणिक काळे (वय 30 वर्षे, रा. कात्रज, पुणे) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने पावले उचलत या जीवघेण्या हल्ल्यात सामील असलेल्या तिन्ही आरोपी रिक्षा चालकांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी सुरज काळे आणि आरोपींमध्ये दोन-तीन वर्षांपूर्वी पॅसेंजर (प्रवासी) भरण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा आणि भांडणाचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी दत्तनगर चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरज याला गाठले आणि त्याच्यावर धारदार हत्याराने थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात सुरज काळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फिर्यादी सुरज यांची प्रकृती व्यवस्थित आणि स्थिर आहे. 

हेही वाचा : नांदेड : मुलीसाठी पेपर विकत घेतला, CBI कडून 8 तास घराची झाडाझडती, 'तो' माणूस नेमका कोण?

हे वाचलं का?