पुणे : नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगावर ओतलं अॅसिड, 15 दिवस असह्य..
Pune Crime : पुण्यातील उरूळी कांचन परिसरातून लाज आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून नवऱ्याने सोन्यासारख्या बायकोवर अमानुषपणे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी नवऱ्याने पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगावर अॅसिड ओतल्याचा आरोप
15 दिवस घरात कोंडून ठेवल्याचा पीडितेचा आरोप
नेमकं काय घडलं?
Pune Crime : आदित्य भावार - पुण्यातील उरूळी कांचन परिसरातून लाज आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून नवऱ्याने सोन्यासारख्या बायकोवर अमानुषपणे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी नवऱ्याने पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला केला, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाचा : मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य
नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगावर अॅसिड ओतल्याचा आरोप
या घटनेप्रसंगी पीडिते महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती हा तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करायचा. 'तुला दोन मुलीच का होतात, तुला मुलगा का होत नाही', असं म्हणत तिचा मानसिक छळ करायचा. याचवरून काही दिवसांपूर्वी हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड ओतून अमानुष कृत्य केल्याचा पीडितेचा आरोप आहे.
15 दिवस घरात कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप
संबंधित घटनेत महिला गंभीरपणे जखमी झाली असून तिच्या शरीरावर मोठी जखम झाली आहे. इतकंच नसून आरोपीला तिला तब्बल 15 दिवस घरात कोंडून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : पालघर: वऱ्हाडाच्या ट्रकवर कंटेनर आदळला, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू
दरम्यान, पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून 9 मे रोजी नवरा कामावरती गेल्यानंतर माहेर गाठलं. माहरेच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी तपाल केला असून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशातच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.









