Govt Jobs : पदवीधरांना कामगार आयुक्तालयात नोकरीची सुवर्णसंधी, अर्जाची शेवटची तारीख काय?
महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालातील विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : पदवीधरांना कामगार आयुक्तालयात नोकरीची सुवर्णसंधी
अर्जाची शेवटची तारीख काय?
Government Jobs : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल 78 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक ही पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, नोकरीचे मुख्य ठिकाण मुंबई हे असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. निरीक्षक (62 जागा) पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. लेखापाल (12 जागा) पदासाठी बी.कॉम (B.Com) पदवीसह 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव अनिवार्य आहे. तसेच लघुटंकलेखक (04 जागा) पदासाठी पदवीधर असण्यासोबतच मराठी व इंग्रजी लघुलेखन (Short Hand) 80 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. असणे गरजेचे आहे. वयाची अट 11 जून 2026 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत असावी, तर मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी मिळणार आहे. निरीक्षक आणि लेखापाल या पदांसाठी रुपये 35,400 ते 1,12,400/- इतके वेतन असून, सोबत महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते मिळतील. तर लघुटंकलेखक या पदासाठी रुपये 25,500 ते 81,100/- या वेतन श्रेणीनुसार अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते दिले जातील. या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रुपये 1000/- परीक्षा शुल्क आकारले जाईल, तर मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/- शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : नागपूर : फायनान्स एजंटला घरात घुसून संपवलं, 15 दिवसांपूर्वी आईचा मृत्यू अन्.. नेमकं कारण काय?
अर्जाची अंतिम तारीख
या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 11 जून 2026 आहे. पात्रताधारक उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळाला (mahakamgar.maharashtra.gov.in) भेट देऊन आपले अर्ज सादर करावेत, कारण अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.









