NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!
NEET Exam Paper Leak : NEET पेपरफुटीचं प्रकरणाची मूळं आता पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन
मांढरे मॅडम अडकल्या, असं कांड केलं की चक्रावून जाल!
NEET Exam Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिक, लातूरनंतर आता पुण्यातून मोठी कारवाई केलीय. पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरेंना या प्रकरणात दिल्लीत अटक केलंय. NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात CBIनं मोठी कारवाई करत तपासाचा वेग वाढवला आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्याशी जोडले गेल्याने सीबीआयचे विशेष पथक पुण्यात दाखल झालं आणि मांढरे यांच्यापर्यंत पोहोचलं. आता या प्रकरणात लातूरचे पीव्ही कुलकर्णी मुख्य सूत्रधार आहेत असं सीबीआयनं म्हटलंय तर मनीषा मांढरेंना देखील मुख्य संशयित म्हणून अटक केलीय. मांढरेंपर्यंत सीबीआय टीम कशी पोहोचली, मांढरेंनी नेमकं काय कांड केलंय हेच जाणून घेऊयात.
हेही वाचा : प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंड घासण्याचं हत्यार, कवटीचे हाड तुटले; प्रेमविवाहाचा भयानक अंत
तर आता या नीट पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित प्राध्यापिका मनिषा मांढरेंना सीबीआयने दिल्लीतून अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, आरोपीकडून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी सीबीआयने पुण्यात धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील ‘गंगा ओशन’ या सोसायटीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि संशयितांच्या निवासस्थानी कसून झडती घेतली.
हेही वाचा : “बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे RTI कार्यकर्ते, सोशल मीडिया युजर्स बनतात अन्..”, सरन्यायाधीश काय म्हणाले?









