जळगाव : कोणी नसताना ZP शिक्षक विद्यार्थीनीला वर्गखोलीत बोलावायचा, अन्...
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील नराधम शिक्षकाने चौथीतील चिमुरडीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जळगाव : ZP शिक्षक कोणी नसताना विद्यार्थीनीला शाळेत बोलावायचा, अन्...
शाळेत अश्लील व्हिडिओ दाखवून करत होता अत्याचार !
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यामध्ये गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुरड्या विद्यार्थिनीचे शाळेतच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून संशयित नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो - POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : कोल्हापूर : पत्नी अन् 2 लेकरांचा डोळ्यासमोर मृत्यू, अडीच वर्ष आठवणींनी छळलं; शेवटी...
पीडित चिमुरडी आपल्या कुटुंबीयांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते आणि तिथल्याच जिल्हा परिषद शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेत आहे. मात्र, ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकानेच तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत गेल्या दोन वर्षांपासून धमक्या देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार सुरू ठेवले होते. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा शाळा भरण्यापूर्वीच सकाळी दहा वाजता पीडित मुलीला वर्गखोलीत झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत एकटीला बोलावून घेत असे. शाळेत इतर कोणीही नसल्याचा आणि एकांताचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करायचा. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर तो चिमुरडीला आपल्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत असे. ही विकृत आणि अमानुष कृत्ये कोणालाही न सांगण्यासाठी तो तिला सतत धमक्या देत होता, ज्यामुळे घाबरलेली मुलगी एवढे दिवस काहीही बोलू शकली नव्हती. नुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2026 रोजी देखील या नराधम शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडून तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केला होता.
हेही वाचा : प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंड घासण्याचं हत्यार, कवटीचे हाड तुटले; प्रेमविवाहाचा भयानक अंत









