बीड : तरुणीनं भररस्त्यात मारली थोबाडीत, तरुणानं वडिलांना फोन केला अन्...
बीडच्या मोहा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : तरुणीनं भररस्त्यात मारली थोबाडीत
तरुणानं वडिलांना फोन केला अन्...
Beed Suicide News, योगेश काशिद : बीडच्या मोहा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेला अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
13 मे रोजी काय घडलं?
चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने 13 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता.
हे ही वाचा : धुळे : धार्मिक पूजन झाले अन् अक्षय, जयश्रीचा जीवच गेला; भोंदू बाबाने काय केले?
'यापुढे माझा फोन येणार नाही'
हा मानसिक त्रास सहन न झाल्याने त्याने 14 मे रोजी सायंकाळी आपल्या वडिलांना फोन केला आणि 'हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही' असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर चंद्रहारने मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे जाऊन लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
हे ही वाचा : जळगाव : कोणी नसताना ZP शिक्षक विद्यार्थीनीला वर्गखोलीत बोलावायचा, अन्...
गळफास घेतलेल्या अवस्थेत
मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संबंधित तरुणीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.









