झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला, पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime News : पुण्यात एका बापाने त्याच्याच मुलावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला केल्यानंतर तो फरार झालाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला
पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime News : पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून संतप्त झालेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलावर ॲसिड फेकल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरात घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तुषार कदम (वय 30) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर त्याचे वडील शाम कदम फरार झाले आहेत.
हेही वाचा : आधी झाडाला बांधून मारले अन् नंतर प्रायव्हेट पार्ट्सचा घेतला चावा; 17 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी तुषार शाम कदम (वय 30) हे आपल्या घरात झोपलेले असताना पैशांच्या कारणावरून त्यांचा वडिलांसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात वडिलांनी घरातील स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲसिडची बाटली मुलाच्या चेहऱ्यावर फेकली.
हेही वाचा : नागपूर : फायनान्स एजंटला घरात घुसून संपवलं, 15 दिवसांपूर्वी आईचा मृत्यू अन्.. नेमकं कारण काय?









