नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर अटकेत, CBI ने ठोकल्या बेड्या; पुण्यात काय घडलं?

ओमकार वाबळे

लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर'चे (RCC) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे.

ADVERTISEMENT

NEET Paper Leak
NEET Paper Leak
google news

बातम्या हायलाइट

point

नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर अटकेत

point

CBI ने ठोकल्या बेड्या

point

पुण्यात काय घडलं?

NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूर येथील प्रसिद्ध 'रेणुकाई करिअर सेंटर' (RCC) चे संचालक शिवराज मोटेगावकर (वय 47) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. रविवारी (17 मे) सायंकाळी सीबीआयने ही धडक कारवाई केली. मोटेगावकर यांच्या अटकेमुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पेपर लीक करणाऱ्या टोळीचे सक्रिय सदस्य

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. तपासादरम्यान समोर आले आहे की, मोटेगावकर यांनी 23 एप्रिल रोजीच नीट परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. ही लीक झालेली प्रश्नपत्रिका त्यांनी अनेक संशयित व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय यंत्रणेला आहे.

हे ही वाचा : NEET Paper Leak : CBI ची लातूरमध्ये मोठी कारवाई, मोटेगावकरांच्या कार्यालयात काय घडलं?

उत्तरे देण्यास टाळाटाळ

या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा संपल्यानंतर मोटेगावकर यांनी पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, सीबीआयच्या चौकशी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकरांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. यापूर्वी 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये त्यांच्या मोबाईल फोनमध्ये परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते.

हे ही वाचा : हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये 'या' पैलवानाची बाजी, पृथ्वीराज मोहोळने का घेतली माघार?

या कलामांतर्गत गुन्हा दाखल

या गंभीर गैरप्रकारामुळे मोटेगावकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, 2024 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान सीबीआयने त्यांच्याकडून ओळखपत्रे आणि विविध बँकांचे डेबिट कार्ड जप्त केले असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
 

हे वाचलं का?