पुणे : मॅट्रीमोनियलवरुन ओळख, हॉटेलमध्ये भेटायला गेली, तर 'तो' 2 महिलांसोबत...

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मुंबई उच्च न्यायालयातील एका महिला वकिलाचा चालत्या कारमध्ये लैंगिक छळ करून तिची पर्स रस्त्यावर फेकून दिल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : मॅट्रीमोनियलवरुन ओळख

point

हॉटेलमध्ये भेटायला गेली, तर 'तो' 2 महिलांसोबत...

Pune Crime News : पुण्यातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.  एका महिला वकिलाचा चालत्या कारमध्ये लैंगिक छळ केल्याचा आणि तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. रविवारच्या रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या एका फरार साथीदाराचा शोध सुरू केला आहे. 

हेही वाचा : कल्याण : ‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’, अनैतिक संबंधातून दीराने केली वहिनीची हत्या

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील ही मूळची बिहार येथील राहणारी आहे. तिने पुण्यातूनच आपले कायद्याचे (लॉ) शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या ती मुंबई उच्च न्यायालयात (हायकोर्ट) वकिलीची प्रॅक्टिस करत आहे. ती एका कामानिमित्ताने पुणे शहरात आली असताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रसंग घडला असून पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.

हेही वाचा : नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!

पीडित महिला वकील रविवारी संध्याकाळी कोरेगाव पार्क येथील एका पंचतारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेलमध्ये थांबली होती. तिने मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या एका व्यक्तीला तिथे भेटण्यासाठी बोलावले होते. ती व्यक्ती हॉटेलमध्ये इतर दोन महिलांसह पोहोचली आणि काही वेळ त्यांच्यात बातचीत झाली. त्यानंतर ते तिघे जण तिथून निघून गेले. यानंतर ती महिला वकील हॉटेलमध्येच थांबून मद्यप्राशन करत असताना, तिची ओळख शेजारच्या टेबलवर बसलेल्या दोन अनोळखी युवकांशी झाली. काही वेळ त्यांच्यात गप्पागोष्टी झाल्या आणि त्यानंतर त्या सर्वांनी मिळून दुसऱ्या एका पबमध्ये जाण्याचा बेत आखला. या नियोजनानुसार ते सर्व जण एका कारमध्ये बसून बंड गार्डन परिसरातील एका पबच्या दिशेने जाण्यासाठी निघाले.

चालत्या कारमध्ये अश्लील टिप्पण्या आणि स्पीकर फोनवर बदनामी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार बंड गार्डनच्या दिशेने जात असतानाच कारमध्ये बसलेल्या एका आरोपीने महिला वकिलासोबत कथितरीत्या लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर प्रवासादरम्यान आरोपींनी आपल्या इतर दोन मित्रांना मोबाईलवर स्पीकर फोन करून कारमधील त्या महिला वकिलाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली. कारमध्ये बसलेल्या इतर लोकांनीही तिला उद्देशून अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या टिप्पण्या केल्या. आरोपींच्या या विकृत कृत्यामुळे आणि अश्लील वर्तनामुळे महिला वकील अत्यंत संतप्त झाली. तिने हिंमत दाखवत आरोपींना त्यांच्या त्या मित्रांना तात्काळ घटनास्थळावर बोलावण्यास आणि सर्वांसमोर आपली माफी मागण्यास भाग पाडले.

हे वाचलं का?